मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मी की मुलं', प्रियकराने ठेवली अट; नवऱ्याला सोडलेल्या महिलेने उचललं धक्कादायक पाऊल

'मी की मुलं', प्रियकराने ठेवली अट; नवऱ्याला सोडलेल्या महिलेने उचललं धक्कादायक पाऊल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

प्रेम आणि ममता यामध्ये महिला अडकली आणि...

  • Published by:  Priya Lad

भोपाळ, 31 ऑगस्ट : प्रेम (Love) आंधळं असतं असं म्हणतात. अशाच प्रेमात किती तरी जण वेडे होतात आणि नको ते निर्णय घेतात. अगदी लग्नानंतरही (Love after marriage) किती तरी जण प्रेमात पडतात आणि आपला सोन्यासारखा संसारही उद्ध्वस्त करतात. पण पुढे जाऊन आपल्याला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचा विचारही अनेकांनी केलेला नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका महिलेने (Married woman fall in love) आपल्या प्रियकरासाठी नवऱ्याला सोडलं (Woman leave husband for lover). त्यानंतर तिच्या मुलांचा प्रश्न येताच तिने टोकाचं पाऊल उचललं

मध्य प्रदेशच्या मंदसौरच्या बनी गावातील महिला प्रेम आणि ममता यामध्ये अडकली. प्रियकरासाठी तिने नवऱ्याला सोडलं. पण तिला आपल्या मुलांना आपल्या सोबत ठेवायचं होतं. तेव्हा तिच्या प्रियकराने तिला दोन पर्याय दिले. एकतर मी किंवा मुलं, यापैकी एक निवडावं लागेल. महिला यावर काहीच निर्णय घेऊ शकत नव्हती. शेवटी तिने तिसराच मार्ग निवडला तो म्हणजे आत्महत्येचा.

हे वाचा - गर्लफ्रेंड दुर्लक्ष करत असल्यामुळे केला खून

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार मंदसौर ग्रामीण SDOP सौरभ कुमार यांनी सांगितलं की, 34 वर्षीय महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे. 14 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिला 11 आणि 6 वर्षे अशी दोन मुलं आहेत. दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या मारहाणीमुळे ती वैतागली होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाच्या ती जवळ आली. दोघंही प्रेमात पडले. सह महिन्यांपूर्वी ती प्रियकरासोबत राजस्थानला गेली होती. रक्षाबंधनला दोघंही पुन्हा गावी परतले होते.

तिला आपल्या दोन्ही मुलांना सोबत न्यायचं होतं, पण तिचा प्रियकर तयार नव्हता. यावरून दोघांमध्ये भांडणं झाली. त्याने मुलं किंवा मी दोघांपैकी एकालाच निवड, असं महिलेला सांगितलं. मुलांना सोबत घेतलं तर तिला सोबत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. मुलांशिवाय ती राहू शकत नव्हती. पण नंतर ती प्रियकरासोबतही गेली नाही. तिने विष पिऊन आपल्याचा आयुष्याचा शेवट केला.

हे वाचा - VIDEO - 'मला माझ्या बायकोपासून वाचवा', नवऱ्याने ढसाढसा रडत मांडली व्यथा

महिलेच्या 11 वर्षांच्या मुलीने आरोपीविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. आरोपीचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh