अहमदाबाद, 2 एप्रिल : शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) गुजरातमधील अहमदाबादला पोहोचले. निवडणुकीच्या (Gujrat Elections) तयारीसाठी केजरीवाल आणि मान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहेत. यादरम्यान अहमदाबादमध्ये केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना टळली. रॅली पाहताना एका व्यक्तीनं छतावर उभं राहून पुढे पुढे वाकून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो छताला लटकला. त्याच्यासोबतच्या लोकांनी त्याचा जीव कसा वाचवला, पहा व्हिडिओमध्ये...
अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान शनिवारी दिवसभराच्या दौऱ्याचा भाग म्हणून गुजरातमधील अहमदाबादला पोहोचले. इथं दोघांनी साबरमती आश्रमात चरख्यावर सूत कातलं. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि भगवंत मान राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या वर्षी गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.
#WATCH | A man was saved from falling off the roof of a seemingly dilapidated house during the roadshow of AAP national convenor and Delhi CM Arvind Kejriwal along with Punjab CM Bhagwant Mann in Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/ZonxMqZc5y
— ANI (@ANI) April 2, 2022
हे वाचा - ..डोळे काढून मुंडकंच उडवतो; घरावर भाजपचा झेंडा लावल्यानं मुस्लीम तरुणाला धमकी
साबरमती आश्रमात काही काळ घालवल्यानंतर केजरीवाल आणि भगवंत मान यांनी अहमदाबादमधील रॅलीत भाग घेतला. या रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना टळली. एएनआय न्यूज एजन्सीकडून, रोड शोचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोघांच्या रॅलीदरम्यान एक माणूस छतावरून रॅली पाहत होता, तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो छताला लटकला. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी मिळून त्याची सुटका केली.
हे वाचा - दोन्ही बायका झाल्या एकदमच गुल, नवरा बनला एप्रिल फूल; पोलीस ठाण्यात गेलं प्रकरण
साबरमती आश्रमात आधी भगवंत मान म्हणाले की, मला इथे यायला खूप आनंद झाला. पंजाबमधील प्रत्येक घरात चरखा आहे कारण पंजाबमधील लोकांच्या मनात महात्मा गांधींबद्दल खूप प्रेम आहे. दुसरीकडे केजरीवाल यांनी साबरमती आश्रम भेटीला निवडणूक दौरा म्हणण्यास नकार दिला. इथं राजकारण करणार नाही, असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Gujrat, Rally in ahmedabad