विदिशा, 01 एप्रिल : आजच्या महागाईच्या आणि आधुनिक काळात एका पत्नीचे लाड पुरवणं माणसाला कठीण जात आहे. अशावेळी विदिशा नगरमध्ये दोन पत्नी एकत्र गायब झाल्याची घटना समोर आली आहे. वैतागलेल्या पतीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि दोन्ही पत्नींच्या हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात (two wives of a businessman) दिली. दोन्ही पत्नींना आपल्या पतीला एप्रिल फूल (April Fools) बनवून परत यायचं होतं, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा हा एप्रिल फूलचा कारनामा उद्ध्वस्त केला. विदिशा हे मध्यप्रदेशमधील एक शहर आहे.
प्रत्यक्षात मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आज दोघींना ट्रॅक करत त्यांच्या भावाच्या घरातून दोघींना ताब्यात घेतले. त्यांना नेऊन पतीच्या ताब्यात देण्यात आलं. विदिशा नगर येथील सिव्हिल लाइन पोलीस ठाणे परिसरातील राजीव नगरमध्ये राहणारे राजेंद्र अहिरवार यांनी मुलीसह त्यांच्या दोन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. दोन्ही बायका एकमेकांना बहीणी लागतात. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता.
हे वाचा - अजब चोरीची गजब कहाणी! 3 दुकानं फोडली पण चोरले फक्त 20 रुपये; कारणही विचित्र
आज मोबाईल लोकेशनच्या आधारे सिव्हिल लाईन पोलिसांनी दोघींचा शोध घेऊन पती राजेंद्रच्या ताब्यात दिले. रामवती आणि राणी या दोघी पत्नी सांगतात की, पतीसोबत फोनवर वाद झाल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात मोबाईल बंद केला. त्यानंतर त्या भावाच्या घरी गेल्या. राजेंद्रने सांगितले की, दोन्ही पत्नींनी त्याला पोलिसांच्या माध्यमातून सुखरूप मिळवून दिले. काल तक्रारदाराने त्याच्या दोन पत्नींसह त्याच्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत करावी, अशी विनंती केली होती.
हे वाचा - गतिमंद मुलीवर बलात्कार; आरोपीच्या निधनानंतरही कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
काय झालं होतं?
या व्यावसायिकाच्या एका बायकोचं वय 26 तर, दुसरीचं वय 23 आहे. या दोघी त्यांच्या माहेरच्या घरी जात असल्याचं सांगून एकत्र घरातून निघून गेल्या होत्या. त्या त्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन निघून गेल्या होत्या. नवऱ्यानं बायकांविषयी चौकशी केली, तेव्हा कळलं की त्या त्यांच्या माहेरच्या घरातून पतीकडे निघाल्या होत्या. पण घरी पोहोचल्या नाहीत. त्यानंतर पतीनं याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पती विदिशा (मध्य प्रदेश) येथील दुर्गा नगर परिसरात इलेक्ट्रिकल वस्तूंचा घाऊक व्यापारी आहे. त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दोन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh