मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /..डोळे काढून मुंडकंच उडवतो; घरावर भाजपचा झेंडा लावल्यानं मुस्लीम तरुणाला धमकी देत मारहाण

..डोळे काढून मुंडकंच उडवतो; घरावर भाजपचा झेंडा लावल्यानं मुस्लीम तरुणाला धमकी देत मारहाण

सध्या पोलिसांनी शकील अहमदच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शकील अहमद यांनी पुन्हा घराच्या छतावर भाजपचा झेंडा लावला आहे.

कानपूर, 1 एप्रिल : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील बाबर अली हत्याकांडावर (Babar Ali Murder Case) अद्याप कारवाई सुरू आहे. हे प्रकरण ताजं असतानाच कानपूरच्या किडवाई नगरच्या जुही लाल कॉलनीत एक खळबळजनक घटना घडल्याचं समोर आली आहे. शकील अहमद नावाच्या व्यक्तीला घरावर भाजपचा झेंडा लावल्यामुळे शेजाऱ्यांनी मारहाण केली आहे. त्याचबरोबर मुस्लिमांसोबत न राहिल्यास त्याचे डोळे काढून शिरच्छेद करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.

कानपूरच्या (Kanpur crime news) किडवाई नगरच्या जुही लाल कॉलनीत राहणारा शकील अहमद याला विधानसभा निवडणुकीच्या वेळी घराच्या छतावर भाजपचा झेंडा लावल्यामुळे शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली. शेजाऱ्यांमुळे त्याच्या घरात दहशतीचं वातावरण आहे.

हे वाचा - Jhatka-Halal Row: हलाल मांस बहिष्कार मोहीम तीव्र; काय आहे हलाल मांस आणि झटका मांसातील फरक?

 शकील अहमद यांनी सांगितली संपूर्ण कहाणी

शकील अहमद यांनी सांगितलं की, ते 2013 पासून भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. शेजाऱ्यांनी त्यांना धमकी दिली होती की, जर तो मुस्लिमांसोबत राहिला नाही तर, त्याचे डोळे काढून त्याचा शिरच्छेद केला जाईल. शकीलच्या म्हणण्यानुसार, तो भाजप समर्थक असल्यामुळे त्याचे शेजारी शाहनवाज हुसेन, रशीद हुसेन, रिझवान, बल्लू टेलर आणि त्यांचा मुलगा पप्पू प्लंबर यांनी विरोध केला आणि मारहाण केली. यासह आरोपींनी त्यांच्या घरावर लावलेला भाजपचा झेंडा फेकून दिला होता.

सध्या पोलिसांनी शकील अहमदच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शकील अहमद यांनी पुन्हा घराच्या छतावर भाजपचा झेंडा लावला आहे.

हे वाचा - 'साधू नव्हे सैतान', जबरदस्तीनं दारू पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार...

 जाणून घ्या काय होतं बाबर अली हत्या प्रकरण

यूपीच्या कुशीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करताना आणि मिठाई वाटल्यामुळं बाबर अली या मुस्लीम तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच, निष्काळजीपणासाठी एसएचओ दुर्गेश सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई आणि कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. योगी यांनी बाबरच्या आईला सांगितलं की, तेही त्यांच्या मुलासारखेच आहेत.

First published:
top videos

    Tags: BJP, Gang murder, Murder news, Up crime news