Home /News /national /

भररस्त्यात तरुण म्हणाला ‘प्रायव्हेट पार्टला हात लाव’, महिलेने काढला फोटो आणि...

भररस्त्यात तरुण म्हणाला ‘प्रायव्हेट पार्टला हात लाव’, महिलेने काढला फोटो आणि...

भररस्त्यात तरुणाने पॅंट काढून महिलेला अश्लिल चाळे करण्यास सांगितले, महिलेने दाखवला इंगा.

    बंगळुरू, 27 जानेवारी : कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये एक भयंकर प्रकार घडला. येथील दोददानेकुंडी तलावाजवळ एक महिला अभियंता मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्याचवेळी पार्कमध्ये आलेल्या एक शिक्षित तरुणाने या महिलेला पाहून त्याची पॅंट काढण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने त्या महिलेला तिच्या खासगी भागास जबरदस्तीने स्पर्श करण्यास सांगितले. या प्रकरणात महिलेने एफआयआर दाखल केला आहे. एका खासगी कंपनीत काम करणारी अभियंता श्वेता (वय 41 ना बदलेले) यांनी, सकाळी सरोवराजवळ फिरायला गेली होती. जेव्हा ती चालण्याच्या मार्गावर आली तेव्हा एक तरुण आपल्या श्वानासोबत तेथे आधीच बसला होता. श्वेता त्या व्यक्तीकडे पोहोचताच त्या व्यक्तीने श्वानाला सोडत श्वेताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वाचा-दुबईत मागितली नोकरी; कंपनीने सांगितलं CAA विरोधात आंदोलन करा, चांगली कमाई होईल महिलेने कॉलर पकडली आणि फोटो काढला दरम्यान, कुत्र्याचा मालक श्वेताकडे आला आणि समोर उभा राहिला आणि त्याने आपली पॅंट काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाने श्वेताचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने त्याच्या खासगी भागाला स्पर्श करण्यास सांगितले. श्वेताने आरडाओरडा केल्यानंतर तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वेताने कॉलरने आरोपीला पकडून त्याचा फोटोही काढला. वाचा-मुंबईची नाईट लाईफ ते बगदादमध्ये रॉकेट हल्ला, वाचा आतापर्यंतच्या टॉप 6 बातम्या श्वेताने एफआयआर दाखल केला आहे या प्रकरणात श्वेता यांनी एचएएल पोलिस स्थानकात भा.दं.वि कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. श्वेता म्हणाली की लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी तिला आशा आहे. श्वेताने आरोपीचा फोटोही पोलिसांना दिला आहे. त्यांनी फेसबुकला पत्र लिहून इतरांना या तलावाजवळ आल्यास काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. वाचा-त्रास सहन न झाल्याने पत्नीने केली तक्रार, पतीने गुजरातीत लिहून दिला तिहेरी तलाक
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या