Home /News /maharashtra /

मुंबईची नाईट लाईफ ते बगदादमध्ये रॉकेट हल्ला, वाचा आतापर्यंतच्या महत्त्वाच्या 6 बातम्या

मुंबईची नाईट लाईफ ते बगदादमध्ये रॉकेट हल्ला, वाचा आतापर्यंतच्या महत्त्वाच्या 6 बातम्या

Mumbai: Bolts of lightning flash across the sky during thunderstorm and rain over the suburbs, in Mumbai, late Monday, June 10, 2019. (PTI Photo/Neel Geelani) (PTI6_11_2019_000037B)

Mumbai: Bolts of lightning flash across the sky during thunderstorm and rain over the suburbs, in Mumbai, late Monday, June 10, 2019. (PTI Photo/Neel Geelani) (PTI6_11_2019_000037B)

आतापर्यंतच्या या 6 महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठीही असतील महत्त्वाच्या, वाचा थोडक्यात...

    1) इराकचा राजधानी बगदादमध्ये रविवारी रात्री अमेरिकन दूतावासाजवळ पाच रॉकेट डागण्यात आले आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. एका महिण्यात अमेरिकन दूतावासाजवळ करण्यात आलेला हा चौथा हल्ला आहे. वृत्त संस्था 'एएफपी'ने सुरक्षा यंत्रणेच्या हवाल्याने दिले आहे. इराणमध्ये तनाव वाढल्यानंतर बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे. इथे वाचा सविस्तर बातमी - इथे वाचा सविस्तर बातमी - एका महिनात चौथा हल्ला, बगदादमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ डागले 5 रॉकेट 2) चीनच्या (China) धोकादायक कोरोना व्हायरसने (Coronavirus) अमेरिकासह डझनभर देशांना घेरले आहे. जगातल्या सगळ्या देशांमध्ये हा व्हायरस पसरत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, भारतातही कोरोना व्हायरसचा धोका वाढला असल्याची बामती समोर येत आहे. रविवारी जयपूरमध्ये (Jaipur) कोरोना व्हायरसचा एका संशयित रुग्ण असल्याचं सांगण्यात आले आहे. इथे वाचा सविस्तर बातमी -कोरोना व्हायरसने भारताचा धोका वाढवला, चीनहून आलेला विद्यार्थी जयपूर रुग्णालयात 3) केंद्राने देशभरात CAA लागू केल्यापासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी CAA विरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र भारताने युरोपातील संसदेवरील चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे. इथे वाचा सविस्तर बातमी -युरोपातील संसदेत CAA विरोधात प्रस्ताव; भारताने सांगितलं, ही आमची अंतर्गत बाब 4) दिग्गज बॉस्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. कोबी ब्रायंट या दिग्गज बॉस्केटबॉलपटूच्या मृत्यूनंतर क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 41 वर्षीय कोबीसह त्याच्या 13 वर्षांच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. इथे वाचा सविस्तर बातमी -हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दिग्गज बॉस्केटबॉलपटूसह 13 वर्षांच्या लेकीचा मृत्यू! 5) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणजेच मुंबई 24 तास खुली ठेवणं. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. आता रात्रभर मुंबईच्या काही भागातली हॉटेल्स, मॉल्स आणि खाऊ गल्ल्या सुरू राहणार आहेत. आत्तापर्यंत जीवाची मुंबई करण्यासाठी लोक येत, आता जेवायची मुंबई करण्यासाठी लोक येतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. इथे वाचा सविस्तर बातमी -आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू 6) महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना बुधवारी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, या योजनेवर मनसेकडून सरकारवर गंभीर टीका करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या शिवथाळी उद्घाटनावरून मनसेने टीका केली आहे. इथे वाचा सविस्तर बातमी -जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करून मनसेची ठाकरे सरकारवर गंभीर टीका
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या