दुबईत मागितली नोकरी; कंपनीने सांगितलं CAA विरोधात आंदोलन करा, चांगली कमाई होईल

दुबईत मागितली नोकरी; कंपनीने सांगितलं CAA विरोधात आंदोलन करा, चांगली कमाई होईल

कंपनीकडून धर्माच्या आधारावर नोकरीच्या ठिकाणी भेदभाव केला जात आहे

  • Share this:

दुबई, 27 जानेवारी : सध्या देशभरात CAA विरोधात प्रदर्शन सुरू असून याचा परिणाम परदेशातही दिसून येत आहे. युरोपीय संसदेतही CAA च्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या एका माहितीनुसार केरळमधील एक तरुणाने दुबईत (Dubai) नोकरीसाठी अर्ज केल्यावर त्याला आलेलं उत्तर अचंबित करणारं आहे. कंपनीने या तरुणाला नोकरी करण्याऐवजी शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे प्रदर्शन करण्यास सांगितले. नोकरीपेक्षा प्रदर्शनात जास्त पैसे कमवशील असा सल्ला या कंपनीने दिला आहे. साधारण दीड महिन्यांपासून दक्षिण दिल्लीतील शाहीन बाग परिसरात CAA विरोधात आंदोलन सुरू आहे. दुबईतील या कंपनीने तत्सम तरुणाला सविस्तर मेल लिहिला आहे.

काय आहे त्या मेलमध्ये

केरळमध्ये राहणारा 23 वर्षीय अब्दुल्ला एस.एस. याने मॅकेनिकल इंजिनियरिंग या पदासाठी दुबईतील एका कंपनीत अर्ज केला होता. दुबईचे वृत्तपत्र ‘द गल्फ न्यूज’ ने दिलेल्या माहितीनुसार, तेथील एक सल्लागार फर्मचे वरिष्ठ अधिकारी जयंत गोखले यांनी नोकरीसाठी अर्ज केलेल्या अब्दुल्ला याच्या इमेल रिप्लाय केला व त्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘मी विचार करतोय की तुम्हाला नोकरीची गरज काय? दिल्लीला जा आणि शाहीनबाग विरोध प्रदर्शन सहभागी व्हा. प्रत्येक दिवशी तुम्हाला 1 हजार रुपये मिळतील. याव्यतिरिक्त मोफत बिरयाणी, चहा, जेवण आणि मिठाई पण मिळेल’.

जयंत गोखले यांनी लिहिलेला हा मेल समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. अब्दुल्ला हा मेल वाचून हैराण झाला. त्याने हा मेल काही मित्रांना दाखवला. त्यानंतर समाज माध्यमातून गोखले याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की गोखले हे धर्माच्या आधारावर नोकरीच्या ठिकाणी भेदभाव करीत आहेत.

विरोध प्रदर्शनात पैसे मिळण्याचा दावा

काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रवक्ता अमित मालवीय यांनी ट्विट करुन शाहीन बाग येथील CAA विरोधातील प्रदर्शनातील सहभागींना दररोज 500 रुपये दिले जात असल्याचा दावा केला आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी मालवीय यांचा दावा फेटाळून लावला आहे.

First published: January 27, 2020, 10:06 AM IST

ताज्या बातम्या