जाहिरात
मराठी बातम्या / देश / देवपूजेसाठी फुलं आणायला गेले होते, घरी परतलेच नाहीत! रस्त्यातच भयंकर घडलं

देवपूजेसाठी फुलं आणायला गेले होते, घरी परतलेच नाहीत! रस्त्यातच भयंकर घडलं

विद्युत तार बऱ्याच दिवसांपासून लटकत होती. त्याबाबत प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आली होती.

विद्युत तार बऱ्याच दिवसांपासून लटकत होती. त्याबाबत प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आली होती.

फुलं घेऊन घरी परतत असताना 11 किलो व्होल्टची विजेची तार तुटून रस्त्यात पडली. तार तुटताच…

  • -MIN READ Local18 Korba,Chhattisgarh
  • Last Updated :

अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 25 जून : कधीही शॉक लागू शकतो, स्फोट होऊ शकतो,या भीतीने आपण इलेक्ट्रिक वस्तू अत्यंत सावधगिरीने हाताळतो. परंतु रस्त्यात चालता चालता काम सुरू असलेल्या विद्युत तारांशी अचानकपणे आपला संपर्क आला तर…पुढे काय अनर्थ होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. अशाच एका अपघाताची बातमी छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून समोर आली आहे. दुरुस्तीत असलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात येऊन एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला. यात त्याची मोटारसायकलही खाक झाली. ताराचंद्र अग्रवाल असं या व्यक्तीचं नाव होतं. एका वाटसरूने या अपघाताचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, कोरबा जिल्ह्यातील करतळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सेंद्रीपाली गावचे रहिवासी ताराचंंद्र अग्रवाल हे सकाळी देवपूजेसाठी फुलं आणायला गेले होते. फुलं घेऊन घरी परतत असताना 11 किलो व्होल्टची विजेची तार तुटून रस्त्यात पडली. तार तुटताच ताराचंंद्र यांच्या मोटारसायकलला आग लागली. पाहता पाहता संपूर्ण मोटारसायकलने पेट घेतला आणि या आगीत होरपळून ताराचंंद्र यांचा मृत्यू झाला. Samruddhi Highway : देवदर्शनाहून निघाले पण…समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘ही विद्युत तार बऱ्याच दिवसांपासून लटकत होती. त्याबाबत प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यात एका व्यक्तीचा जीव गेला’, असा आरोप त्यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे वीज विभागाकडून पाऊस पडण्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची देखभाल-दुरुस्तीची कामं केली जातात, परंतु तरीही पाऊस पडल्यावर ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्याचा तक्रारी समोर येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात