नवी दिल्ली, 29 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊनसुद्धा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या समारंभात सामील होणार नाहीत. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होतो, पण आता तशी इच्छा का नाही हे सांगणारं एक पत्रच ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींनी लिहिलं आहे.
येत्या गुरुवारी म्हणजे 30 मे रोजी नरेंद्र मोदींसह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याचं निमंत्रण आहे. याशिवाय काही परदेशी पाहुणेही या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पश्चिम ममता बॅनर्जींना देण्यात आलं होतं. पण त्या या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं त्यांनी कळवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी थेट नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे हे पत्र?
नवे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शुभेच्छा! संवैधानिक निमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी समारंभाला येण्याचा माझा विचार होता. पण गेल्या काही तासांपासून माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या मी बघते आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचारात 54 जण मारले गेले असल्याचा भाजप दावा करत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. बंगालमध्ये कुठलीही राजकीय हिंसा झालेली नाही. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्याची कारणं वैयक्तिक, कौटुंबिक किंवा अन्य काही वैमनस्य असू शकेल; पण त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमच्याकडे हे कुठल्याही रेकॉर्डवर नाही.
याच कारणाने मी शपथविधी समारंभाला येऊ शकत नाही, मला माफ करा नरेंद्र मोदीजी. हा समारंभ लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे, कुठल्या पक्षाला कमी लेखून राजकारण करण्याचा नाही. मला माफ करा.
ममतांचा निर्णय कधी फिरला?
पंतप्रधानांच्या शपथविधीला हजर राहण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला होता. पण माध्यमांमध्ये तृणमूलचे नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या आणि राजकीय हिंसाचाराला तृणमूल जबाबदार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि ममता बॅनर्जींनी या समारंभाला न जाण्याचा निर्णय घेतला.
मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचं वजन वाढणार, अशी मिळू शकतात मंत्रिपदं
'मला मंत्रिपद नको', अरूण जेटलींचं मोदींना पत्र
SPECIAL REPORT: काँग्रेस खरंच गांधीमुक्त होणार?
निवडणुकीच्या आधी प्रचारादरम्यानही ममता विरुद्ध मोदी सामना रंगला होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही, असंही ममता तेव्हा म्हणाल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जींचं शपथविधी समारंभाला अनुपस्थित राहणं या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे.
बंगालमध्ये हिंसाचारात मारले गेलेल्या कार्यकर्त्यांनाही निमंत्रण
नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे. या सोहळ्याचं कुणाकुणाला निमंत्रण मिळालं आहे याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये एक बातमी बंगालमधून आली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना 30 तारखेच्या या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपने अशा 54 जणांना शपथविधी कार्यक्रमात सामील होण्याचं निमंत्रण दिल्याचं समजतं. भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना दिल्लीत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था भाजपतर्फे करण्यात आली आहे, असं समजतं.
नागपुरात उष्माघातामुळे 10 जणांचा आकस्मिक मृत्यू; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.