Home /News /maharashtra /

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांनी पार केला 9 हजारांचा टप्पा, 400 जणांनी सोडले प्राण

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांनी पार केला 9 हजारांचा टप्पा, 400 जणांनी सोडले प्राण

आनंदाची बाब म्हणजे आज 106 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    मुंबई, 28 एप्रिल: राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 25, जळगाव येथील 4 तर पुणे शहरातील 2 आहेत. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता एकूण 400 झाली आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे आज 106 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने दिलेली माहिती अशी की, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,29,931 नमुन्यांपैकी 1,20,136 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत. हेही वाचा...लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना.. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 664 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 9361 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 38.30 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. मुंबईतील संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. आजही केवळ धारावीत 42 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज येथे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणणे पालिकेसमोरचं मोठं आव्हान आहे. हेही वाचा.. Work From Home जुलैपर्यंत मिळणार घरून काम करण्याची सूट, केंद्राची घोषणा मुंबईत एकूण रूग्ण संख्या 6169 वर पोहोचली आहे. तर आतापर्यत 244 रुग्ण दगावली आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 330 झाली आहे तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत मंगळवारी 42 रुग्ण सापडले आहे. हे रुग्ण एकाच भागातील नसून विविध भागातील आहेत. त्यामुळे धारावीत कम्युनिटी संसर्ग पसरत चालला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पालिकेकडून येथील रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सध्या धारावीतील अनेक भागांमध्ये हॉटस्पॉट उभारले आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी ठिकठिकाणी अशा स्वरुपाच्या हॉटस्पॉटची आवश्यक व्यक्त केली जात आहे. हेही लाचा.. धक्कादायक! कम्युनिटी किचनमधले डब्बे रिकामे, 6000 नागरिकांना राहावं लागलं उपाशी पुण्यात 4 महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात... पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 122 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात हीच आकडेवारी 1491 वर गेली आहे. ससूनमध्ये आणखी दोन कोरोना पेशंट्सचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा 79 तर जिल्ह्यातली मृतांची संख्या 83 वर पोहोचली आहे. याशिवाय विविध हॉस्पिटलमध्ये तब्बल 73 क्रिटिकल पेशंट्सवर उपचार सुरू आहेत. यातही समाधानाची बाब म्हणजे तब्बल 27 पेशंट्स बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात ससूनमधील एका 4 महिन्यांच्या बाळाचा आणि 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. संकलन, संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या