Work From Home जुलैपर्यंत मिळणार घरून काम करण्याची सूट, केंद्राची घोषणा

Work From Home जुलैपर्यंत मिळणार घरून काम करण्याची सूट, केंद्राची घोषणा

डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स ला यापुढच्या काळात सर्वच सरकारांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 एप्रिल: लॉकडाऊनमुळे सगळा देश ठप्प आहे. व्यवहारच बंद असल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. आयटी आणि इतर डिजिटल क्षेत्रातली मंडळी मात्र सध्या घरूनच काम करत आहे. त्यामुळे Work From Home हा शब्द चर्चेत आहे. कोरोनाचा वेग वाढतच असल्याने लॉकडाऊनमध्ये सुट मिळाली तरी अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावण्यास इच्छूक नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मोठी घोषणा केली आहे.

आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापर्यंत घरूनच काम करू देऊ शकतात अशी घोषणा त्यांनी आज केली. गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरून काम करण्याचा पर्याय हा चांगला आहे. त्यासाठी आयटी कंपन्यांना काही नियमांमध्ये सुट हवी आहे. ती सुट त्यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इंटरनेटचा वेग कायम ठेवण्यासाठी Bharat Net मदत करणार असल्याची घोषणाही त्यांनी कली. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर वाढल्याने नेट कंपन्यांवर त्याचा दबाव पडतोय. त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टिकरण दिलं.

येणाऱ्या काळात सर्व राज्य सरकारने नव्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स ला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

देशात कम्युनिटी लागण झाली का? आरोग्य मंत्रालयाने केला मोठा खुलासा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. सुरुवातीला 21 दिवस आणि नंतर आणखी त्यात वाढ करण्यात आली. 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे. पण कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच असल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढणार की सरकार काही सुट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

लॉकडाऊन हटवलं तर कोरोना प्रसाराचा धोका आणि कायम ठेवलं तर अर्थव्यवस्थेची दुरावस्था अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडलं असून 3 मे नंतर काय धोरण असावं यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे.

CRPF मध्ये कोरोनाचा पहिला बळी, 55 वर्षांच्या जवानाने सोडले प्राण; 46 जणं बाधित

सरकारने जे हॉटस्पॉट घोषीत केलेत त्या ठिकाणचे निर्बंध कायम ठेवून इतर ठिकाणी काही सुट मिळण्याची शक्यता आहे. उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार काही नियम शिथील करण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे आणि विमान वाहतूक लगेच सुरू करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी यावर स्पष्टकरण दिलं आहे. ही सुट नाही तर आधीचेच नियम जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.

First published: April 28, 2020, 11:07 PM IST

ताज्या बातम्या