महाकाल मंदिरात विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या; लेडी सिंघम रुबी यादवने सांगितला त्याच्या अटकेचा थरार

महाकाल मंदिरात विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या; लेडी सिंघम रुबी यादवने सांगितला त्याच्या अटकेचा थरार

पोलिसांची निघृणपणे हत्या करणाऱ्या विकास दुबेला ही लेडी सिंघम न घाबरता सामोरे गेली आणि त्याला ताब्यात घेतले

  • Share this:

लखनऊ, 9 जुलै : महाकाल मंदिराची सुरक्षा अधिकारी रुबी यादव यांनी आज एका न्यूज चॅनलला अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या. लेडी सिंघमने सांगितले की, तिची टीम सकाळी 7.15 च्या सुमारास राऊंडवर होती, विकास दुबेसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला फुलवाल्याने पाहिले. त्याने याबाबतची माहिती आमच्या टीमला दिली. त्यानंतर मी माझ्या टीमला सांगितले जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत पकडायचे नाही.

विकास दुबे बाहेर फिरत होता आणि तो काहीही करू शकला असता. मग आमची टीम त्याच्या मागे गेली. त्याने 250 रुपयांचे तिकीट घेतले आणि शंख गेटने प्रवेश केला, तोपर्यंत आमच्या टीमने त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.

चेहरा पाहून ओळखणे कठीण

मी माझ्या सुरक्षा रक्षकाला विकास दुबेचा एक फोटो पाठविण्यास सांगितले, माझ्याकडे आलेल्या फोटोमध्ये त्याचा चेहरा वेगळा होता. त्याने आपले केस लहान केले होते, चष्मा आणि मास्क लावला होता. शिवाय तो बारीकही दिसत होता. त्यामुळे त्याचा चेहरा पाहून ओळखणे कठीण झाले होते.

मी माझ्या टीमला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले. जेवढ्या काळात त्याने दर्शन घेतले त्यावेळास मी गुगल करुन त्याचे फोटो तपासून घेतले. गूगल सर्चमधील वॉन्टेड फोटोच्या डोक्यावर डाग होता. जेव्हा माझ्या गार्डने पाठविलेले चित्र मी पाहिले तेव्हा मी झूम करुन पाहिले तर त्याच्याही कपाळावर जखम होती.यानंतर मला खात्री झाली की हा विकास दुबे आहे, परंतु कोणीही पॅनिक होऊ नये म्हणून मी ही गोष्ट माझ्या टीमला सांगितली नाही.

बनावट ओळखपत्रांद्वारे गुंडगिरी करीत होता

यानंतर मी एसपी साहेबांना फोन करून माहिती दिली. मी माझ्या सुरक्षा रक्षकांना सांगितले की तुम्ही त्याला लाडूच्या काउंटरवर बसवा आणि आम्ही त्याला पहात आहोत याविषयी त्याला शंका येऊ देऊ नका. मी सुरक्षा रक्षकांना सांगितले की तुम्ही त्याला ओळखपत्राविषयी विचारा आणि तर इतर कामे करा.

हे वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता करणार मोठी घोषणा

त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव शुभम सांगितले आणि खिशातून आयकार्ड काढला. या कार्डावर त्याचे नाव नवीन पाल होते. तो बनावट आय कार्डद्वारे गुंडगिरी करत फिरत होता. मंदिरमध्ये त्याने मी विकास दुबे असल्याने कबूल केले. यादरम्यान त्याने आपच्या एका सहकाऱ्यासोबत झटापटीही केली. त्याने एका गार्डाची नेम प्लेट काढली आणि त्याचं घड्यात तोडलं. त्यानंतर एसपी आणि स्थानिक पोलीस आल्याने त्याला तातडीने अटक करण्यात आलं.

 

Published by: Meenal Gangurde
First published: July 9, 2020, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading