Home /News /national /

सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजप ऍक्शन मोडमध्ये, मुंबईत पुन्हा कोरोना विस्फोट TOP बातम्या

सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजप ऍक्शन मोडमध्ये, मुंबईत पुन्हा कोरोना विस्फोट TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 28 जून : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये (Maharashtra Politics) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) आणि त्यांच्या गटात असलेल्या शिवसेना आमदारांना दिलासा दिला आहे. 11 जुलैपर्यंत या आमदारांवर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यानंतर आता भाजप (BJP) ऍक्शन मोडमध्ये आली आहे. या सत्तासंघर्षात राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणं मुंबईत आहेत. देशविदेशातील घडामोडी अगदी काही मिनिटांत वाचा. महाराष्ट्राच्या सत्तापटात भाजप ऍक्शन मोडमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये (Maharashtra Politics) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) आणि त्यांच्या गटात असलेल्या शिवसेना आमदारांना दिलासा दिला आहे. 11 जुलैपर्यंत या आमदारांवर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यानंतर आता भाजप (BJP) ऍक्शन मोडमध्ये आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजपने पहिल्यांदाच उघडले पत्ते सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची (BJP) एण्ट्री झाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ठाकरे कीं शिंदे.. सत्ताकारणात कोण मारणार बाजी? महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात एकनाथ शिंदे गट राज्यपालांकडे फ्लोर टेस्टसाठी जाण्याची शक्यता आहे. खरे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दिलासा मिळू शकतो. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरे त्याच दिवशी घेणार होते मोठा निर्णय.. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्ह घेतलं, त्या दिवशी ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 21 किंवा 22 तारखेलाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सध्याच्या राजकीय पेचावर मनसेची भूमिका काय? राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. अशात आता नुकतंच राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर रविवारी घरी परतले आहेत. यानंतर लगेचच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी बराच वेळी त्यांची फोनवर चर्चा झाली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'ईडीच्या चौकशीला हजर राहू शकणार नाही; पण मी पळ काढणारा नाही' : संजय राऊत एकीकडे सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या याचिकांवर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचवेळी ईडीने संजय राऊत यांनी समन्स बजावलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मंत्रिमंडळ खातेवाटप: ठाकरे-शिंदे वादात शिवसेनेची पिछेहाट, राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढलं शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिलं आहे. आठवडाभरापासून हा संघर्ष सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांना आव्हान दिलं जातंय. या सर्व संघर्षात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत बंडखोरी करणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. या मंत्र्यांच्या खात्यांचा पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवण्यात आलाय. त्याचा थेट फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना झाला आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचं मंत्रिमंडळातील वर्चस्व (NCP) आणखी वाढलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. धक्कादायक! मुंबईत 99.63% रुग्ण Omicron sub variant ने बाधित राज्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आहेत ती मुंबईत. राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण मुंबईतच सापडत आहेत (Mumabi coronavirus cases). अशात आता मुंबई महापालिकेने कोरोनाचा एक रिपोर्ट जारी केला आहे. मुंबईतील कोरोनाच्या जीनोम सिक्वेसिंगचा हा रिपोर्ट आहे. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळ आधी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि काल उपमुख्यमंत्री यांना कोरोनची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona spread, Eknath Shinde

    पुढील बातम्या