Home /News /maharashtra /

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजपने पहिल्यांदाच उघडले पत्ते

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा पुढचा अंक, भाजपने पहिल्यांदाच उघडले पत्ते

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची (BJP) एण्ट्री झाली आहे.

    मुंबई, 27 जून : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर आता पहिल्यांदाच राज्याच्या सत्तानाट्यात भाजपची (BJP) एण्ट्री झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर झाली, या बैठकीनंतर मुनगंटीवार बाहेर आले आणि त्यांनी संवाद साधला. 'राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झालं. भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाली, आमची सध्या वेट ऍण्ड वॉचची भूमिका आहे. येणाऱ्या दिवसात जी परिस्थिती निर्माण होईल ती पाहून पुन्हा आमची बैठक होईल. या बैठकीत राज्यातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,' असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत अजूनही चर्चा झालेली नाही. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. हे बोलताना मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचं सांगितलं. दोन-तृतियांश आमदार असणाऱ्यांना बंडखोर कसं म्हणायचं, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटाचं हिंदूत्व 24 कॅरेट सोन्यासारखं असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या