मराठी बातम्या /बातम्या /देश /

एका मुलीचा फोटो ठरला नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं कारण? वाचा सुसाइड नोटमध्ये आनंद गिरी यांच्यावर काय आहे आरोप

एका मुलीचा फोटो ठरला नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं कारण? वाचा सुसाइड नोटमध्ये आनंद गिरी यांच्यावर काय आहे आरोप

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri Suicide Note) यांच्या आत्महत्येला त्यांचे शिष्य स्वामी आनंद गिरी जबाबदार असल्याचा आरोप महंत नरेंद्र गिरी यांनी स्वतः लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये केला आहे.

प्रयागराज, 22 सप्टेंबर: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri Suicide Note) यांच्या आत्महत्येला त्यांचे शिष्य स्वामी आनंद गिरी जबाबदार असल्याचा आरोप महंत नरेंद्र गिरी यांनी स्वतः लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. मीडिया अहवालानुसार, स्वामी आनंद गिरी (Swami Narendra Giri) यांनी कम्प्युटरच्या साहाय्याने एका मुलीसोबत आपला फोटो मॉर्फ करून ते आपल्याला ब्लॅकमेल करत होतो, असं महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिलं आहे. तसंच, हा मॉर्फ केलेला फोटो ते व्हायरल (Morphed Photo Viral) करणार होते, असंही त्यांनी लिहिलं आहे. 'मी माझं संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगलो. हा फोटो सगळीकडे पसरला, तर समाजात मी सन्मानाने जगू शकणार नाही. त्यापेक्षा मरणं बेहत्तर,' अशी भावना त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. 13 सप्टेंबरलाही आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे.

महंत नरेंद्र गिरी यांची सुसाइड नोट पोलिसांकडे आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं आहे, की 'आनंद गिरीमुळे मी आज व्यथित झालो. हरिद्वारमधून मला कळलं, की तो एका मुलीसोबत माझा फोटो कम्प्युटरच्या साहाय्याने जोडून वाईट काम करत असल्याचं दर्शवणारा तो व्हायरल करणार आहे आणि मला बदनाम करणार आहे. मी असा विचार केला, की एकदा बदनाम झालो, तर कुठे कुठे स्पष्टीकरण देत राहू? बदनाम झालो, तर ज्या पदावर आहे त्या पदाची प्रतिष्ठाही धुळीला मिळेल. त्यापेक्षा मरून जाणंच श्रेयस्कर आहे. मी मेल्यानंतर तरी सत्य समोर येईलच. मी आजपर्यंत समाजात सन्मानाने राहिलो आहे. बदनामी झाली, तर या समाजात मी राहू कसा? त्यापेक्षा मरणं बेहत्तर.'

महंत गिरींची आत्महत्या की हत्या? संतांकडून खुनाचा आरोप,सरकार सखोल चौकशीसाठी तयार

महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाइड नोटमध्ये असंही लिहिलं आहे, की ते 13 सप्टेंबरलाच आत्महत्या करू इच्छित होते; मात्र त्या दिवशी तसं करण्याचा धीर त्यांना झाला नाही. त्यानंतर हरिद्वारमधून त्यांना कळलं, की आनंद दोन दिवसांत तो फोटो व्हायरल करणार आहे, तेव्हा त्यांना आत्महत्येचा निर्णय निश्चित केला. 'माझ्या आत्महत्येला आनंद गिरी, पुजारी आद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी हे तिघं कारणीभूत आहेत. मी पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रार्थना करतो, की या तिघांवर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून माझ्या आत्म्याला शांती मिळेल,' असं महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिलं आहे.

आपला शिष्य बलवीर गिरी (Balveer Giri) यांना आपला उत्तराधिकारी बनवावं, असंही महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. त्यांनी महंत हरी गोविंद पुरी (Mahant Hari Govind Puri) यांना उद्देशून लिहिलं आहे, की 'मढीचं महंतपद बलवीर गिरी यांनाच देण्यात यावं. तुम्ही कायम मला साथ दिलीत. माझ्या मृत्यूनंतरही मठाची प्रतिष्ठा कायम राखावी.'

कोण आहेत आनंद गिरी? यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद

'प्रिय बलवीर गिरी, मठ मंदिराची व्यवस्था मी जशी राखली होती, तशीच उत्तम राखण्याचे प्रयत्न करा,' असंही त्यांनी लिहिलं आहे. आपल्या काही शिष्यांकडे लक्ष ठेवा, त्यांची काळजी घ्या, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

First published:

Tags: Allahabad