• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Mahant Narendra Giri Death Case: हत्या की आत्महत्या? 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं

Mahant Narendra Giri Death Case: हत्या की आत्महत्या? 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली..

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली..

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri Death) यांच्या निधनानंतर अनेक संत त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. संत समुदायाकडून हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri Death) यांच्या निधनानंतर अनेक संत त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र गिरी यांच्या कथित सुसाईड नोटच्या (Suicide Note) सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महंत गिरी यांचा मृतदेह त्यांच्या शिष्यांना छताला लटकलेला आढळून आला होता, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक के. पी. सिंह (IG K.P. Singh) यांनी दिली आहे. घटनास्थळी 7 ते 8 पानांची एक कथित सुसाईड नोटही आढळून आली होती. 'मी मानसिकदृष्टया अस्वस्थ असून, आपलं जीवनकार्य संपवत आहे', असं त्या नोटमध्ये लिहिलं होतं. तसंच मी माझ्या एका शिष्यामुळे चिंताग्रस्त असल्याचं त्यांनी या नोटमध्ये लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण दिसत असून, शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर स्थिती अधिक स्पष्ट होईल.आखाडा परिषदेचे पदाधिकारी आल्यानंतर महंतांच्या अंत्यसंस्काराबाबत निर्णय घेतला जाईल,' असं के. पी. सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, अनेक संत आणि धार्मिक संस्था मृत्यूचं नेमकं कारण काय असा प्रश्न सातत्यानं उपस्थित करत असून, महंतांच्या मृत्यूबाबत त्यांची भूमिका मांडताना दिसत आहेत. हे वाचा-महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात,गनरचीही होणार चौकशी-सूत्र आत्तापर्यंत करण्यात आलेले दावे आणि असं आहे पोलिसांचं म्हणणं 1) महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनाचा संबंध त्यांचे शिष्य आनंद गिरी (Who is Anand Giri) यांच्याशी त्यांच्या असलेल्या कथित वादाशी जोडला जात आहे. आनंद गिरी यांचं नाव महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या सुसाईट नोटमध्ये नमूद केल्यानं पोलिसांनी या प्रकरणी आनंद गिरी यांना ताब्यात घेतलं आहे. सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरींवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. 2) मात्र, अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस जितेंद्रानंद सरस्वती यांनी या सुसाईड नोटच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महंत नरेंद्र गिरी हे कशीबशी स्वाक्षरी करायचे ते एवढी मोठी सुसाईड नोट कशी लिहू शकतील?, असा प्रश्न जितेंद्रानंद सरस्वतींनी उपस्थित केला आहे. 3) या प्रकरणाचा सखोल तपास करून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Deputy CM Keshav Maurya) यांनी म्हटलं आहे. सरकार सर्वप्रकारे तपास करण्यास तयार आहे. गरज भासल्यास आम्ही सीबीआय तपासासाठीही तयार आहोत. काहीही झालं तरी सरकार आखाडा परिषदेच्या मागण्यांकडं दुर्लक्ष करणार नाही, असं मौर्य यांनी सांगितलं. 4) महंत नरेंद्र गिरी मृत्युप्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. हे वाचा-'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट 5) 'महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केलेली नाही. त्यांची हत्या करण्यात आली असून, याच्याशी मोठे आर्थिक व्यवहार जोडलेले आहेत, मठातील अनेक सदस्यांचा यात हात असू शकतो', असं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आनंद गिरी यांनी म्हटलं आहे. 6) पोलिसांना महंत गिरी यांच्या फोन कॉल डिटेल्समधून मृत्यूशी संबंधित काही पुरावे हाती लागले असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. 7) महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूच्या 5 ते 6 तास आधी केलेले कॉल डिटेल्स पोलीस तपासत असून, संपर्क तपशीलाच्या आधारे संशयितांची चौकशी केली जाणार आहे. 8) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 9) महंत नरेंद्र गिरी यांनी गळफास घेतला आहे, असा फोन मठातून सायंकाळी 5.30 वाजता पोलिसांना आला होता. ते दिवसभर ज्या मठात राहायचे तेथे त्यांचा मृतदेह आढळून आला आहे, असं आयजी के.पी. सिंह यांनी सांगितलं. 10) दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मंगळवारी सकाळी महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रयागराज येथे पोहोचले. नक्की काय घडलं ते पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.
First published: