Home /News /national /

Mahant Narendra Giri Death: कोण आहेत आनंद गिरी? यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद

Mahant Narendra Giri Death: कोण आहेत आनंद गिरी? यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद

आनंद गिरी हे उत्तराखंडचे रहिवासी असून ते निरंजनी आखाड्याचे सदस्य होते.

आनंद गिरी हे उत्तराखंडचे रहिवासी असून ते निरंजनी आखाड्याचे सदस्य होते.

प्रयागराज आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri Maharaj) यांचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्यानंतर त्यांचे शिष्य आनंद गिरी (Disciple Anand Giri arrest) यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
    प्रयागराज, 21 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील प्रयागराज आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्यानंतर त्यांचे शिष्य आनंद गिरी (Disciple Anand Giri arrest) यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये आनंद गिरीसह दोन अन्य शिष्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही काळापूर्वी आनंद गिरी आणि नरेंद्र गिरी यांच्यात संपत्तीवरून वाद झाला होता. यानंतर आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच निरंजनी आखाड्यातील दोन साधूंच्या मृत्यूला हत्या संबोधलं होतं. कोण आहेत आनंद गिरी? आनंद गिरी हे उत्तराखंडचे रहिवासी असून ते निरंजनी आखाड्याचे सदस्य होते. त्यांनी संत परंपरेचं योग्य पालन न केल्याचा आरोप केल्याचा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत कायम संपर्क ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच कारणातून महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरींची निरंजनी आखाड्यातून हकलपट्टी केली होती. नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्या वादातील मुख्य कारण बाघंबरी पीठाची गादी असल्याचं बोललं जात आहे. हेही वाचा-मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग;कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग आखाड्यातून हकलपट्टी झाल्यानंतर आनंद गिरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करत, गुरू महंत नरेंद्र गिरी यांच्यावर अनेक आरोप केले होते. तसेच त्यांनी आश्रमाची जमीन परस्पर विकल्याचा आरोपही आनंद गिरी यांनी केला होता. त्याच बरोबर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षा पुरवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पण या नाट्यानंतर आनंद गिरी आणि नरेंद्र गिरी यांच्या समेट झाला होता. आनंद यांनी गुरू नरेंद्र गिरींचे पाय धरून माफी देखील मागितली होती. हेही वाचा-'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट याशिवाय देश विदेशात योगा शिकवणाऱ्या आनंद गिरी यांनी ऑस्ट्रेलियात दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता. 2019 मध्ये आनंद गिरी यांनी योगा शिकवण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याचा आरोप दोन अल्पवयीन मुलींनी केला होता. त्यामुळे आनंद गिरी यांना तुरुगांत देखील जावं लागलं. पण कोर्टात कोणताच पुरावा समोर न आल्याने त्यांची सुटका करण्यात आली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh

    पुढील बातम्या