Home /News /national /

Sushant singh rajput: ‘प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर माफिया आणि बॉलिवूडचा दबाव’

Sushant singh rajput: ‘प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर माफिया आणि बॉलिवूडचा दबाव’

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दिवसेंदिवस गूढ वाढतच चाललं आहे. कारण बॉलिवूडमधील एका गटामुळे सुशांतने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होत असतानाच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधातही आरोपांची राळ उठली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दिवसेंदिवस गूढ वाढतच चाललं आहे. कारण बॉलिवूडमधील एका गटामुळे सुशांतने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होत असतानाच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधातही आरोपांची राळ उठली आहे.

'सुशांत हा बिहारचा सुपूत्र होता. त्याला न्याय मिळावा असं इथल्या सगळ्याच पक्षांना वाटतं. त्यामुळे प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.'

    पाटना 1 ऑगस्ट: अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant singh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. यात राजकारणाला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर बॉलिवूड आणि माफियांचा दबाव आहे असा आरोप त्यांनी केला. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोदी म्हणाले, सुशांत हा बिहारचा सुपूत्र होता. त्याला न्याय मिळावा असं इथल्या सगळ्याच पक्षांना वाटतं. त्यामुळे प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने बिहारच्या मजुरांना परत पाठविण्यासाठी खळखळ केली होती. आता सुशांत प्रकरणीही महाराष्ट्र सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे सरकाने आता हद्द केली आहे. आधी मजुरांसाठी आडवणूक आणि आता न्याय देण्यास चालढकल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून गेले आहे. बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या राजकारणावरून  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाजपला फटकारून काढले आहे. अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार 'अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. धक्कादायक! कंगनाच्या घराजवळ गोळीबार? अभिनेत्रीची सुरक्षा वाढवली तसंच, 'या प्रकरणी पुरावे हे महत्त्वाचे आहे. जर कुणाकडे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे दिलेच पाहिजे. दोषींची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, पण या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये वाद निर्माण करण्यासासाठी करू नका' असंही उद्धव ठाकरे यांनी राजकारण करणाऱ्यांना बजावलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या