Home /News /entertainment /

धक्कादायक! कंगनाच्या घराजवळ गोळीबार? अभिनेत्रीची सुरक्षा वाढवली

धक्कादायक! कंगनाच्या घराजवळ गोळीबार? अभिनेत्रीची सुरक्षा वाढवली

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी थेट आरोप करत आवाज उठवल्यावरून मला धमकवण्यासाठी हे कृत्य असू शकतं, असं कंगनाचं म्हणणं आहे.

    मनाली (हिमाचल प्रदेश), 1 ऑगस्ट : चित्रपट अभिनेत्री कंगना रनौटच्या (Kangana Ranaut) घराजवळ शुक्रवारी रात्री गोळीबाराचा आवाज झाला. त्यानंतर अभिनेत्रीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh Rajput demice)मृत्यूप्रकरणी थेट आरोप करत आवाज उठवल्यावरून मला धमकवण्यासाठी हे कृत्य असू शकतं, असं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनाच्या मनाली इथल्या घराजवळ रात्री गोळीबाराचा आवाज झाला. कुल्लू पोलिसांनी लगेचच कंगनाच्या घराकडे धाव घेतली आणि सुरक्षा पुरवली. या प्रकाराबद्दल बोलतना कंगना रानौट म्हणाली, "काल रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. मी तेव्हा बेडरूममध्ये होते. मला पहिल्यांदा फटाक्याचा आवाज वाटला. पण त्यानंतर लगेच दुसरा गनशॉटचा आवाज आला. माझ्या सुरक्षा व्यवस्थापकाला लगेच मी अलर्ट केलं. त्यालाही सुरुवातीला मुलांनी फटाके उडवले असतील असं वाटलं. त्यानं आसपास चौकशी केली पण मुलं दिसली नाहीत." कंगनाने या घटनेसंदर्भात सविस्तर निवेदनच प्रसिद्ध केलं आहे. पाटणा पोलीस तपासणार सुशांतच्या घरचे CCTV फुटेज, धागेदोरे सापडण्याची शक्यता या निवेदनात कंगनाने म्हटलं आहे,"माझ्या घराच्या मागे सफरचंदाच्या बागा आहेत. जंगलही जवळ आहे. काही बागायतदार वटवाघुळांना पळवून लावण्यासाठी बंदुकीचा वापर करतात, हे माहित आहे. त्यामुळे सकाळी आम्ही आसपासच्या सर्व बागायदारांना यासंदर्भात विचारलं. कुणीही रात्री गोळ्या झाडल्या नाहीत किंवा बंदुकीचा वापर कलेला नाही." 'साहेब झोपून असायचे,रिया मॅम पार्टी करायच्या',सुशांतच्या बॉडीगार्डची प्रतिक्रिया "माझ्या बेडरूमच्या अगदी समोरच्या बाजूकडून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने कुंपणाच्या भिंतीपलीकडून मुद्दाम मला लक्ष्य करण्यासाठीच हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे. इथे गावात पाच - सात हजार देऊन कुणाकडूनही असं काम करून घेता येतं. मला त्रास देण्याचा प्रयत्न होईल, अशी कल्पना हितचिंतकांनी दिली होती. पण मुंबईत आल्यावर नव्हे तर इथे मनालीतही अशा प्रकारे मला गप्प करण्याचा प्रयत्न होतो आहेय सुशांत सिंह राजपूतला या अशा प्रवृत्तींचा सामना करायला लागला असेल. पण मी अशा प्रकाराने डगमगणार नाही आणि गप्प बसणार नाही. मी प्रश्न विचारत राहणार," असंही कंगनाचं म्हणणं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या