Home /News /national /

VIDEO: रुग्णांच्या नातेवाईकांवर ऑक्सिजन सिलेंडर चोरण्याची वेळ, डॉक्टरांचा काम बंद करण्याचा इशारा

VIDEO: रुग्णांच्या नातेवाईकांवर ऑक्सिजन सिलेंडर चोरण्याची वेळ, डॉक्टरांचा काम बंद करण्याचा इशारा

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Corona Cases) दमोहमधील पोटनिवडणुकीनंतर कोरोना संक्रमणाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली आहे की, सामान्य माणूस ऑक्सिजन (Oxygen Cylinder) लुटण्यासाठीही मागेपुढे पाहत नाही आहे.

    दमोह, 21 एप्रिल: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Corona Cases) दमोहमधील पोटनिवडणुकीनंतर कोरोना संक्रमणाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली आहे की, सामान्य माणूस ऑक्सिजन (Oxygen Cylinder) लुटण्यासाठीही मागेपुढे पाहत नाही आहे. आणखी चिंताजनक बाब म्हणजे याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांच्या बेजाबदार वागण्याला कंटाळून डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफ काम थांबवण्याची धमकी देत ​​आहेत. एकंदरित दमोह मधून समोर येणारी चित्रं चिंता वाढवणारी आहे. रात्रीच्या वेळी ऑक्सिजन स्टोअर रूममधून रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन सिलेंडरची लुटमार करतानाचे हे चित्र काळजात चर्रर करणारं आहे. हा प्रकार दमोहमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात (Government Hospital in Damoh) घडला. याठिकाणी कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याशी (Oxygen Shortage) लढणाऱ्या लोकांची कुटुंबं ऑक्सिजन सिलेंडर मिळावा याकरता लुटमार करत आहेत. (हे वाचा-असा देणार लढा? Covid 19 च्या काळात भारतानं दुपटीनं वाढवली ऑक्सिजन निर्यात) गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात अशाप्रकारे सिलेंडरची लूट सुरू आहे. या लुटमारीमुळे कोव्हिड वॉर्डांमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. लोकांच्या हे लक्षात येत नाही आहे की त्यांच्या या चुकीमुळे कदाचित त्यांच्या माणसाचा जीव वाचेल पण त्यामुळे आयसीयू वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रूग्णांच्या जीवावर परिणाम होऊ शकतो. मंगळवारी रात्री उशिरा देखील अशीच लूट केली गेली. शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांनी पॅरा मेडिकल स्टाफ, इतर कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याबरोबर गैरवर्तन देखील केले. या सर्व गोंधळानंतर नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांना पुन्हा काम सुरू करावं लागलं. पण यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होतो आहे. (हे वाचा-'इतकं लाचार कधीच वाटलं नाही...', कोरोनाची भयाण परिस्थिती; डॉक्टरला कोसळलं रडू) एकंदरित परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि सीएमएचओ घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या प्रतिनिधींकडून पोलिसांनाही या परिस्थितीची माहिती मिळाली. असा आरोप केला जात आहे की, सोमवारी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर सिव्हील सर्जननी रुग्णालय आवारात आणि विशेषत: ऑक्सिजन स्टोअर रूममध्ये संरक्षणाची मागणी केली होती. पण एसपींनी याकडे लक्ष दिले नाही. दमोहच्या जिल्ह्या रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉ.ममता तिमोती यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, भीतीपोटी सिव्हिल सर्जन्सनी काम थांबवण्याची धमकी दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर जिल्गाधिकारी तरुण राठी यांनी अशी माहिती दिली आहे की या घटनेनंतर अशाप्रकारे लूटमार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Covid-19, India, Oxygen supply, Robbery, Viral video.

    पुढील बातम्या