Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनासोबत लढ्यासाठी अशी तयारी? Covid 19 च्या काळात भारतानं दुपटीनं वाढवली ऑक्सिजन निर्यात

कोरोनासोबत लढ्यासाठी अशी तयारी? Covid 19 च्या काळात भारतानं दुपटीनं वाढवली ऑक्सिजन निर्यात

सरकारनं मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून यंदाच्या जानेवारीपर्यंत ऑक्सिजनची निर्यात दुपटीनं वाढवली आहे. या काळात भारतानं जवळपास 9,294 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्यात (India Exported 9300 Metric Tonnes of Oxygen) केली आहे.

    नवी दिल्ली 21 एप्रिल : देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. अशात ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा (Oxygen Shortage in India) जाणवू लागला आहे. मात्र, अशात आता समोर आलेला अधिकृत डेटा हैराण करणार आहे. यातील आकडेवारीनुसार, मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून यंदाच्या जानेवारीपर्यंत ऑक्सिजनची निर्यात दुपटीनं वाढवली आहे. या काळात भारतानं जवळपास 9,294 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्यात (India Exported 9300 Metric Tonnes of Oxygen) केली आहे. यातून तब्बल 8.9 कोटींची कमाई झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही गोष्ट समोर आली आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक कोरोना प्रभावित देश असताना आणि देशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असतानाही ही निर्यात केली गेली. याआधीच्या वर्षी भारतानं 4,502 मेट्रीक टन ऑक्सिजनचीच निर्यात केली होती. हा ऑक्सिजन द्रव ऑक्सिजनच्या रूपात होता, याचा वापर औद्योगिक आणि वैद्यकीय वापरासाठी केला जातो. भारत सर्वाधिक ऑक्सिजनची निर्यात शेजारी बांगलादेशला करतो. आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या नऊ महिन्यांत भारताची ऑक्सिजन निर्यात 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली असताना आता सरकारने तब्बल 50,000 मे.टन वैद्यकीय ऑक्सिजन परदेशातून आयात करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच म्हटले आहे, की ऑक्सिजन कुठून आयात केला जाऊ शकतो हे ओळखण्यासाठी आणि जगभरातील भारताच्या मुत्सद्दी मोहिमेवर जाण्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली आहे. 'इतकं लाचार कधीच वाटलं नाही...', कोरोनाची भयाण परिस्थिती; डॉक्टरला कोसळलं रडू देशातील ऑक्सिजन उत्पादन क्षमता भरपूर असल्याचा दावा सरकारने सातत्याने केला आहे. मात्र, कोरोना काळात याचा तुटवडा आणि महत्त्व अधिक जाणवलं. मागील आठवड्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याचं वृत्त आल्यानंतर सरकारनं हे स्पष्ट केलं, की भारतात प्रत्येक दिवसाला 7,127 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता आहे. 18 एप्रिल रोजी भारतात आतापर्यंतचा सर्वाधिक 4,300 मे. टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. कोरोनापूर्वी हा वापर प्रत्येक दिवसाला 850 मेट्रीक टन इतका असायचा. तर, सप्टेंबर 2020 मध्ये हा वापर 3,100 मेट्रीक टनावर पोहोचला होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona virus in india, Oxygen supply

    पुढील बातम्या