Home /News /mumbai /

'इतकं लाचार कधीच वाटलं नाही...', कोरोनाची भयाण परिस्थिती सांगताना मुंबईतील डॉक्टरला कोसळलं रडू

'इतकं लाचार कधीच वाटलं नाही...', कोरोनाची भयाण परिस्थिती सांगताना मुंबईतील डॉक्टरला कोसळलं रडू

कोरोनाची सद्यस्थिती सांगताना मुंबईतील संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा (Dr Trupti gilada) यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांधच फुटला.

    मुंबई, 20 एप्रिल : दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या, ऑक्सिजनचा अभाव, बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या लशीचा तुटवडा... कोरोनाची परिस्थिती इतकी भयंकर झाली आहे की, आता डॉक्टरही बिथरले आहेत. मुंबईतील कोरोनाची भयाण परिस्थिती सांगताना तर मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरलाही रडूच कोसळलं. मुंबईतील संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा कोरोनाची सद्यस्थिती सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांधच फुटला. कोरोनाची सद्यस्थिती काय आहे, लोकांनी काय करायला हवं यासाठी तज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा यांनी एक व्हिडीओ शेअर केला. खरं वास्तव सांगता सांगता त्यांना रडू आवरलं नाही. त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. डॉ. तृप्ती गिलाडा म्हणाल्या,"अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही. मुंबईची हालत खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार कधीच झाल्यासारखं वाटत नाही. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत" हे वाचा - कोरोनाविरोधी लढ्यात PM मोदींचं तरुणांना एक आवाहन; सोपवली मोठी जबाबदारी "मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे तर असं बिलकुला नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही वेंटिलेटरवर आहेत. जगण्यासाठी धडपडत आहेत", असं डॉ. गिलाडा यांनी सांगितलं. डॉ. गिलाडा पुढे म्हणाला, "जर तुम्हाला ताप आला तर पॅनिक होऊ नका. लगेच रुग्णालयात दाखल होऊ नका. असं घाबरून अनेक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना बेड्स मिळत नाहीत आणि घरीच त्यांना ऑक्सिजन देऊन त्यांच्यावर उपचार करावे लागत आहेत" हे वाचा - खाकी वर्दीला सलाम! लॉकडाऊन लावण्यासाठी गरोदर महिला थेट रस्त्यावर स्वतःची काळजी घ्या. कोविड तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे. तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुम्ही मास्क घालायलाच हवा. तुम्हाला कोरोना झाला नाही किंवा झाला असेल तरी तुम्हाला कोरोना होणार नाही असं नाही. शिवाय लसही घ्या. असं आवाहनही डॉ. गिलाडा यांनी केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Mumbai, Woman doctor

    पुढील बातम्या