दरम्यान, मनसेच्या महाअधिवेशनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबई 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसेचा हा महामेळावा होत आहे. या महावेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची नवी दिशा ठरवणार आणि सांगणार आहेत. शिवसेनेतील दोन गटांत तुफान राडा, पदाधिकाऱ्याचे डोके फुटले पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सोडून गेलेल्या शिलेदारांना पुन्हा मनसेत आणण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्याचबरोबर प्रकाश महाजन यांनाही राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं होतं. या भेटीनंतर प्रकाश महाजन म्हणाले, 23 तारखेच्या महाअधिवेशनामध्ये येण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. 23 तारखेच्या अधिवेशनात मनसेत मोठ्या इनकमिंगची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा हिंदुत्व मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे. हर्षवर्धन जाधव म्हणाले,राज ठाकरेंनी भेटीचे आमंत्रण दिले होते, त्यानुसार आमची भेट झाली. गेल्या अनेक काळापासून आम्ही संपर्कात नव्हतो. या काळातील बऱ्यात विषयांवर चर्चा झाली. मी परत यायचं की नाही यासाठी विचार करायला मला वेळ हवा आङे. मी लवकरच निर्णय जाहीर करतो.ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे.....
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 20, 2020
| | मराठा तितुका मेळवावा |
महाराष्ट्र धर्म वाढवावा ||
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.