मराठी बातम्या /बातम्या /देश /दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, 268 रुपयांनी महागला कमर्शियल LPG Gas Cylinder

दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, 268 रुपयांनी महागला कमर्शियल LPG Gas Cylinder

 सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून LPG Gas Cylinder च्या किंमतीत वाढ केली आहे.

सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून LPG Gas Cylinder च्या किंमतीत वाढ केली आहे.

सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून LPG Gas Cylinder च्या किंमतीत वाढ केली आहे.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : दिवाळीआधी महागाईचा मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून LPG Gas Cylinder च्या किंमतीत वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडिन ऑइल कॉर्पोरेशनने 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 268 रुपये प्रति सिलेंडर वाढ केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 264 रुपये प्रति सिलेंडर वाढली आहे.

या आधी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडर दरात 43.5 रुपयांची मोठी वाढ केली होती.

19 किलोग्रॅम गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती -

दिल्लीत 19 किलोग्रॅम गॅसची किंमत 2000.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये कमर्शियल गॅसचा भाव 268 रुपयांनी वाढून 2073.5 रुपये झाला आहे. यापूर्वी हा दर 1805.50 रुपये होता.

मुंबईत कमर्शियल गॅसच्या दरात 265 रुपयांची वाढ झाली असून हा दर 1950 रुपये झाला आहे. याआधी कमर्शियल सिलेंडर 1685 रुपये होता.

चेन्नईत कमर्शियल गॅस 265.50 रुपयांनी वाढून 2133 रुपये झाला आहे. यापूर्वी ही किंमत 1867.5 रुपये होती.

जबरदस्त! वयाच्या 16 वर्षी सुरू केलं Saving; 21 येईपर्यंत खरेदी केलं स्वत:च घर

घरगुती गॅस सिलेंडर दर स्थिर -

महत्त्वाची बाब म्हणजे तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत 14.2 किलोग्रॅम विना सब्सिडी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये इतकी आहे.

ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.

तुम्हीदेखील एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

असा तपास LPG Gas Cylinder चा दर -

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे रेट्स जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx यावर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचा दर तपासू शकता.

First published:

Tags: Gas, LPG Price