Home /News /money /

तुम्हीदेखील एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

तुम्हीदेखील एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

आपल्यापैकी काही लोक एकाचवेळी अनेक बँकांची क्रेडिट कार्डं घेऊन फिरत असतात. असे लोक पाहिले की, खरोखरच एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डची आवश्यकता असते का? असा प्रश्न पडतो

नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : तुम्हाला कधी वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी आणि क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन येतात का हो? येतच असतील कारण सध्याच्या काळात रोख पैशांऐवजी कार्डला जास्त महत्त्व आलं आहे. आपल्या वॉलेटमध्ये कॅशऐवजी डेबिट (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card), आधार कार्ड, पॅन कार्ड (Pan Card), एखादं आयडी कार्ड, मेट्रो कार्ड यासारख्या कार्ड्सचा भरणा असतो. कॅशलेस पेमेंटच्या (Cashless Payment) जगात तर क्रेडिट कार्ड असणं ही व्यक्तीची गरज बनली आहे. आपल्यापैकी काही लोक एकाचवेळी अनेक बँकांची क्रेडिट कार्डं घेऊन फिरत असतात. असे लोक पाहिले की, खरोखरच एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डची आवश्यकता असते का? एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे काही फायदे आहेत का? असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया... फायनान्स कन्सल्टंट्स (Finance Consultants) म्हणतात की, क्रेडिट कार्ड्स तुम्हाला कर्जाच्या दलदलीत ढकलण्याचं काम करतात. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड व्यक्तीला कर्जाच्या सापळ्यात असं अडकवतात की, त्यातून ती कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणून गरजेच्या वेळीचं क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे. शिवाय वापर केल्यानंतर त्याचं बिल भरण्याची देखील व्यवस्था केली पाहिजे. कारण क्रेडिट कार्डचं व्याजदेखील सावकाराच्या व्याजाप्रमाणे जास्त असतं, असं मत फायनान्स कन्सल्टंट्स व्यक्त करतात. RBIकडून या बँक खात्यासंदर्भातील नियमात बदल, कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी क्रेडिट कार्डचे फायदे कुठलीही गोष्ट काळजीपूर्वक वापरली की त्याचा निश्चित फायदा होतो, हे एक वैश्विक सत्य आहे. क्रेडिट कार्डच्या वापरासाठीदेखील हा नियम लागू होतो. क्रेडिट कार्डचा हुशारीने वापर केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही अनेक दिवस व्याजाशिवाय पैसे वापरू शकता. तुमच्या खिशात पैसे नसले तरीही आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करू शकता. क्रेडिट कार्डच्या मदतीनं तुम्हाला ५० दिवसांसाठी व्याजाशिवाय उसने पैसे मिळू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याच्या 1 तारखेला क्रेडिट कार्डचा वापर करून काही खरेदी केली असेल, तर तुम्हाला त्याचे बिल (Bill) भरण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी मिळतो. म्हणजेच तुम्ही पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत बिल भरू शकता. त्या बिलावर व्याज (interest) आकारले जात नाही. मात्र, जर तुम्ही 50 दिवसांच्या कालावधीनंतर पैसे भरले तर त्यावर व्याज द्यावे लागेल. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरण्यातच शहाणपणा आहे. क्रेडिट कार्ड रोलओव्हर (Rollover) टाळा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल मुदतीनंतर भरत असाल तर नक्कीच तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण मुदतीनंतर क्रेडिट कार्डची थकबाकी भरताना दंड म्हणून जास्त व्याज भरावं लागतं. आता अशा कर्जांचे व्याजदरदेखील वाढवण्यात आले आहेत. क्रेडिट कार्डची बिलं भरण्याची मुदत तुम्ही टाळली किंवा ती रोलओव्हर केली तर तुम्हाला व्याजमुक्त कर्जाचा लाभ मिळत नाही. काहीवेळा तर अशी वेळ येते की, तुमच्याकडं संपूर्ण बिल भरण्यासाठी पैसे नसतात आणि तुम्ही बिलाची फक्त 5 टक्के रक्कम भरण्यास सक्षम असता. अशा परिस्थितीमध्ये तुमचं शिल्लक राहिलेलं बिल पुढच्या महिन्यात जातं आणि थकबाकीवर 2 ते 3 टक्के व्याज देखील आकारलं जातं. जर अगोदरच अशी परिस्थिती असताना तुम्हाला पुन्हा क्रेडिट कार्डनं खरेदी करावी लागत असेल, तर विचार करा तुमचं किती नुकसान होतं. Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 1 लाखाचे 1.71 कोटी दुसऱ्या कार्डचा वापर जर तुम्ही तुमच्या एका क्रेडिट कार्डचं बिल काही कारणास्तव भरू शकत नसाल तर, अशावेळी तुमच्याकडे असणारं दुसऱ्या एखाद्या बँकेचं क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरू शकतं. दुसरं क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही नवीन खरेदी करू शकता. यामुळं तुम्ही एका कार्डवर न भरलेल्या बिलांमध्ये होणारी आणखी वाढ टाळू शकता. मात्र, असे करताना लवकरात लवकर दोन्ही क्रेडिट कार्डची बिलं भरण्याची देखील सोय करा. कार्ड देणारी बँक तुम्हाला प्रलंबित बिलांची रक्कम कार्डमध्ये हस्तांतरित करण्याची परवानगी देते. काही बँका या सेवेसाठी पहिले 1 ते 2 महिने पैसे आकारत नाहीत. संकटकाळात मदत कधी-कधी तुमच्या कार्डमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं किंवा बँकेचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तुम्ही ऐनवेळी क्रेडिटकार्डनं पेमेंट करू शकत नाही. कधीकधी पीओएस मशीन तुमचं कार्ड रीड करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या खिशात ठेवलेलं दुसरं क्रेडिट कार्ड कामी येतं. एकूणचं क्रेडिट कार्डचे काही फायदे आणि तोटे दोन्ही देखील आहेत. मात्र, त्यांचा काळजीपूर्वक आणि हुशारीनं वापर केला तर निश्चितपणे जास्त फायदे मिळू शकतील.
First published:

Tags: Credit card, Instant loans

पुढील बातम्या