मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शुभमंगल सावधान...महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने 61 व्या वर्षी घेतला लग्न करण्याचा निर्णय

शुभमंगल सावधान...महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने 61 व्या वर्षी घेतला लग्न करण्याचा निर्णय

कुल वासनिक हे रवीना खुराना यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले आहेत.

कुल वासनिक हे रवीना खुराना यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले आहेत.

कुल वासनिक हे रवीना खुराना यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले आहेत.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 8 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मुकुल वासनिक यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. मुकुल वासनिक हे रवीना खुराना यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले आहेत. विवाहबंधनात अडकल्यानंतर नवदाम्पत्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'नुकतंच लग्न झालेल्या मुकुल वासनिक आणि रवीना खुराना यांना शुभेच्छा देताना मला आणि माझी पत्नी नाझनिनला खूप आनंद होत आहे. मुकुल वासनिक यांच्याशी माझी पहिली भेट 1984 साली झाली होती आणि 1885 साली वर्ल्ड यूथ अँड स्टुडंट फेस्टिवलसाठी मॉस्को इथं गेल्यानंतर रविना यांच्याशी भेट झाली. या दोघांसाठी आम्ही खूप आनंदी आहोत,' अशा शब्दांत काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहेत मुकुल वासनिक?

मुकुल वासनिक हे भारत सरकारचे माजी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील रामटेक मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आयएनसी) या पक्षाचे सदस्य आहेत. ते अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीसही आहेत.

हेही वाचा- नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

1984 मध्ये वासनिक हे वयाच्या 25 व्या वर्षी सर्वात कमी वयाचे खासदार झाले. वासनिक हे भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. नंतर वासनिक हे 1988-1990 दरम्यान भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ते महाराष्ट्रातील दिग्गज कॉंग्रेस नेते आणि तीन वेळा खासदार बाळकृष्ण रामचंद्र वासनिक यांचे पुत्र आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी ते बुलढाणा येथून निवडून आले.

First published:

Tags: Congress