लोकसभा निवडणूक 2019: पाटण्यात तेजप्रताप यांच्या गाडीची काच फोडली

लोकसभा निवडणूक 2019: पाटण्यात तेजप्रताप यांच्या गाडीची काच फोडली

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अर्थातच अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. एकूण 59 जागांसाठी 918 उमेदवार रिंगणात आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 मे- लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात 59 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ वाराणसीतही आज मतदान होत आहे. सोबतच सात केंद्रीय मंत्र्यांचे भविष्याचा फैसला जनता करणार आहे. भाजपमधून बाहेर पडलेले शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आमने-सामने आहेत.

पंजाब आणि उत्तर प्रदेश (प्रत्येकी 13), पश्चिम बंगाल (9), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (तीन) आणि चंडीगडमधील एक जागेसाठी मतदान होणार आहे. पणजी (गोवा) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वाराणसीमध्ये भाजप उमेदवार नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस उमेदवार अजय राय, महाआघाडीच्या उमेदवार शालिनी यादव अशी तिरंगी लढत आहे. बिहारमध्ये रविशंकर प्रसाद, रामकृपाल यादव, आर. के सिंह आणि अश्विनी कुमार चौबे यांच्यासह 157 उमेदवारांचं भवितव्य जनता ठरवणार आहे.

संतप्त कॅमेरामॅननं गाडीची काच फोडली

तेजप्रताप यादव घरातून निघाले असताना त्यांच्या गाडीखाली कॅमेरामनचा पाय आला. यानंतर संतप्त कॅमेरामननं गाडीची काच फोडली. यानंतर मग तेजप्रताप यांच्या सुरक्षारक्षकांनी या कॅमेरामनला मारहाण केली. यासंपूर्ण गोंधळावर तेजप्रताप यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात सुखबीरसिंग बादल, सुनील जाखड, भगवंतसिंग मान, हरसिमरत कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी, बॉलीवूड अभिनेता सनी देओल, मनीष तिवारी, प्रणीत कौर, किरण खेर, पवनकुमार बन्सल, हरमोहन धवन आदी नेते पंजाबमध्ये रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह सनोज सिन्हा, अभिनेते रविकिशन यांच्यासह सपा आणि बसपाच्या आठ नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद होणार आहे.

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याबरोबर पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात 6 उमेदवार असून मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. यासाठी 30 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. यासाठी 22 हजार 419 मतदार या मतदारसंघात आपला मतदानाच्या हक्क बजावतील. यापैकी 10 हजार 673 पुरुष तर 11 हजार 746  महिला मतदार या मतदारसंघात आहेत. मतदानासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीआरपी, केंद्रीय राखीव दल आणि राज्य पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

LIVE UPDATES..

'रोड नही तो वोट नही'च्या घोषणा..

बिहार- पाटलीपुत्रा लोकसभा मतदार क्षेत्रातील नौबतपूर सलारपूर (बूथ नंबर 329) येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 'रोड नही तो वोट नही', अशा घोषणाबाजी करत गावकऱ्यानी मतदान केंद्रावर गोंधळ केला.  त्यावर प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.

- उत्तरी 24 परगनामध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला

- लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी इंदूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क

-मध्य प्रदेशमधील मतदानाची टक्केवारी

देवास-19.19%

उज्जैन-14.60%

मंदसौर-15.98%

रतलाम-17.75%

धार-14.21%

इंदूर-10.84%

खरगोन-16.09%

खंडवा-13.45%

- सकाळी 11 वाजेपर्यतची मतदानाची टक्केवारी:

बिहार-18.90%

हिमाचल प्रदेश- 17.66%

मध्य प्रदेश- 22.85%

पंजाब- 20.85%

उत्तर प्रदेश- 19.48%

पश्चिम बंगाल- 29.03%

झारखंड-28.72%

- बिहारमध्ये सकाळी 10 वाजेपर्यत मतदानाची टक्केवारी

नालंदा- 14.21 %

पाटणा  साहिब- 9.85 %

पाटलिपुत्रा- 11.38 %

आरा- 13.58 %

बक्सर- 12.79 %

सासाराम- 13.10 %

काराकाट- 16 %

जहानाबाद- 12.79 %

-मध्य प्रदेश- भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बजावला मतदानाचा हक्क

-गोरखपूर- उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला. देशहिताचे काम करणारेच टिकतील, लोकशाहीचा महायज्ञ हा आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं योगी आदित्यनाथ यांनी आवाहन केलं आहे.

-सोनभद्र- मतदान कर्मचाऱ्याना घेऊन जाणारी बस उलटली, 11 जण गंभीर जखमी. ओबरा लोकसभा मतदारसंघात बूथ क्र. 89,90 आणि 91 वर जात होते कर्मचारी. जखमींना चोपन सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.

-कुशीनगर- मतदानादरम्यान बूथ क्र. 183 च्या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, पिपरा जटामपूर गावात आहे बूथ

SPECIAL REPORT : देवा तुझ्या दारी आलो, मोदींना पावणार का भोलेनाथ?

First published: May 19, 2019, 6:53 AM IST

ताज्या बातम्या