आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी चर्चेत आहे 'इंदूर मॉडेल'

आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी चर्चेत आहे 'इंदूर मॉडेल'

रुग्णांवर उपचार करताना किमान 8 तास डॉक्टरांना पीपीई किट काढता येत नाही. यादरम्यान तहान जरी लागली तरी त्यांना पाणी पिता येत नाही.

  • Share this:

इंदूर, 19 एप्रिल : जगभरातील कोरोनाच्या (Coronavirus) संकटाविरोधात डॉक्टर आणि नर्सेस मुकाबला करीत आहेत. हा व्हायरसमुळे झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने आता देशातील अनेक डॉक्टर व नर्सेसना कोरोनाची (Covid - 19) लागण झाली असून अनेकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र यांचे काम अत्यंत अवघड अशा स्वरुपाचे आहे.

इंदूरमध्ये कोरोना व्हायरसच्या विरोधात पुकारलेल्या युद्धातील डॉक्टर पीपीई किट परिधान केल्यानंतर पुढील तब्बल 8 तास पाणीदेखील पिऊ शकत नाहीत नाही. अशा प्रतिकूल प्रतिस्थितीत डॉक्टर आणि नर्सेससाठी ही ड्यूटी कोणत्याही कमांडो ट्रेनिंगपेक्षा कमी नाही. सध्या इंदूरमध्ये 890 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण त्यांच्याकडून एक जरी चूक घडली तरी ती महागात पडू शकते. त्यांच्या या कामामुळे त्यांना कोरोना योद्धा म्हटंल गेलं आहे. ज्याप्रमाणे जवान आपल्या प्राणाची बाजी लावून युद्धात लढातात तसंच या कोरोनाविरोधातील युद्धात आरोग्य कर्मचारी जीवाला धोका असतानाही लढत आहेत.

कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्रच नंबर वन! योगींचं उत्तरप्रदेश कितव्या स्थानी?

कोरोनासारख्या जीवघेण्यात आजारांमुळे जगभरात हजारो जणांचा जीव गेला आहे. त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस आपली जीव धोक्यात घालून काम करीत आहे. त्यांचे काम अत्यंत जिकरीचे आहे. ते सुरक्षिततेसाठी असलेला पीपीई किट परिधान आणि काढायला  करायला किमान 1 तास लागतो. त्यानंतर ड्यूटीदरम्यान ते 8 ते 12 तास तो पोशाख काढू शकत नाही. अशावेळेस ते पाणीदेखील पिऊ शकत नाही आणि टॉयलेटलाही जाऊ शकत नाही.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर आणखी कमी होणार, सरकारने आखला नवा प्लॅन

व्हारसपासून सुरक्षा देण्यासाठी किट आवश्यक आहे. एकदा हे किट काढल्यानंतर त्यांचा पुन्हा वापर करता येऊ शकत नाही. जर आपात्कालिन परिस्थितीत किट काढावे लागले तर दुसऱ्यांदा नवे किट घालावे लागते. आधीच आपल्याकडे पीपीई किटचा अभाव आहे. अशातच डॉक्टर नर्सेसना तहानलेल्या परिस्थितीत काम करावे लागते.

5 दिवस काम 15 दिवस क्वारंटाइन

एमआपटीबी रुग्णालयात कर्मचारी संध्या कुशवाह यांनी सांगितले की ते 5 दिवस काम करतात आणि 15 दिवस क्वारंटाइनमध्ये असतात. जर रुग्णांची सेवा करीत असताना त्यांना कोविडची लागण झाली असेल तर या 15 दिवसात याबाबत खुलासा होऊ शकतो यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

First published: April 19, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या