रुडकी, 05 मे : कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. 17 मेपर्यंत एकूण 54 दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान या काळात लोकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येत नाही आहे. त्यामुळे काही भागात रस्त्यावर अजिबातच गाड्या दिसत नाही आहेत. रहदारी असणाऱ्या अनेक रस्त्यांन मोकळा श्वास घेतला आहे. मालवाहक ट्रक्स काही वेळा दिसून येतात मात्र खाजगी गाड्या शक्यतो बाहेर पडत नाही आहेत. त्याचप्रमाणे कारखाने, औद्योगिक कारखाने बंद आहेत. परिणामी पर्यावरणाची हानी कमी झाली आहे. अगदी नद्यानाले देखील स्वच्छ झाले आहेत. गंगा नदीचा स्वच्छ पाण्याचा व्हिडीओ देखील गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे वाचा- विदेशी अडकलेल्या भारतीयांना परत येण्यासाठी द्यावं लागेल तब्बल 1 लाख भाडं!) दरम्यान उत्तराखंडमध्ये सुद्धा लॉकडाऊनमुळे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. प्रदुषण कमी झाल्यामुळे हवा इतकी स्वच्छ झाली आहे की रुडकीमधूनच हिमालय पर्वत दिसू लागला आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार रुडकीतून गंगोत्री रेंजचे पर्वत दिसल्याने या परिसरातील नागरिक सुखावले आहेत. रुडकीपासून गंगोत्री 312 किलोमीटर अंतरावर आहे. तरी सुद्धा आकाश एकदम स्वच्छ झाल्यामुळे एवढ्या लांबून सुद्धा गंगोत्रीमधील सुंदर पर्वत पाहायला मिळत आहेत. (हे वाचा- राकेश रोशन यांनी ऋषी कपूरना दिल्लीत न जाण्याची दिली होती ताकिद आणि तिथेच…) केवळ उत्तराखंडच नव्हे तर उत्तर प्रदेशमधून देखील हिमालय पर्वत आता दिसत आहे. 30 एप्रिल रोजी अशी बातमी समोर आली होती की, सहारनपूरमध्ये वायु प्रदुषण दाखवणारा वायु गुणवत्ता सूचकांक (AQI) सुद्धा 40 पेक्षा खाली आला होता. जणू काही हवेतील प्रदुषण गायब होत आहे. त्यामुळे बर्पाच्छादित पर्वतरांगा दिसत आहेत. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.