विदेशी अडकलेल्या भारतीयांना परत येण्यासाठी द्यावं लागेल तब्बल 1 लाख भाडं!
विदेशी अडकलेल्या भारतीयांना परत येण्यासाठी द्यावं लागेल तब्बल 1 लाख भाडं!
बस किंवा ट्रेनच्या प्रवासाप्रमाणे विमानातून प्रवास करण्यासाठी 20- 25 मिनिटं आधी पोहचू नका. किंमान एक ते दीड तास आधी पोहोचणं अपेक्षित आहे. विमानतळावर चेकिंग आणि इमिग्रेशनदरम्यान बराच वेळ लागतो.
7 ते 13 मे दरम्यान पहिल्या टप्प्यात 12 देशांमधून 15 विमानांना 64 विमानाद्वारे परत आणलं जाईल.
नवी दिल्ली, 05 मे : विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी मेपासून महा-अभियान सुरू करण्यात येणार आहे. परदेशातून येणाऱ्या भारतीयांना भाडं आणि क्वारंटाऊन ठेवण्याचे शुल्क स्वत: द्यावे लागतील, असं सरकारनं म्हटलं आहे. त्यासाठी भाडंही निश्चित करण्यात आलं आहे. 7 ते 13 मे दरम्यान पहिल्या टप्प्यात 12 देशांमधून 15 विमानांना 64 विमानाद्वारे परत आणलं जाईल.
लंडन ते दिल्ली दरम्यान प्रति व्यक्ती भाडं 50 हजार रुपये निश्चित केलं आहे. ढाका ते दिल्ली दरम्यानचं भाडं 12 हजार रुपये असेल. सिंगापूरहून येणाऱ्यांना सुमारे 20 हजार रुपये मोजावे लागतील. लंडनहून मुंबई, अहमदाबाद, बंगलोर येथेही 50 हजार रुपये द्यावे लागतील. यूएस शिकागो ते दिल्ली, हैदराबादला सुमारे 1 लाख रुपये द्यावे लागतील.
सर्व प्रवाशांची 14 दिवस तपासणी केली जाईल आणि क्वारंटाईन ठेवण्यात येईल. विमानात सर्व प्रकारच्या सुरक्षा नियमांचंही पालन केलं जाईल. सौदी अरेबियाची 10 उड्डाणं, अमेरिका, ब्रिटन आणि मलेशिया येथून 7-7 उड्डाणं, सौदी अरेबिया, सिंगापूर, फिलीपिन्स आणि कुवैत इथून 5-5 उड्डाणं आणि कतार, बहरेन आणि ओमान इथून 2-2 उड्डाणं भारतीय नागरिकांना देशाच्या वेगवेगळ्या राज्यात घेऊन जातील. जास्तीत जास्त 15 उड्डाणं केरळमध्ये येतील आणि यात 7 देशांमधील लोक असतील. तामिळनाडू आणि दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांची 1111 उड्डाणं आहेत. दोन्ही राज्ये 9-9 देशातील प्रवासी आणतील.
लॉकडाऊनमध्ये सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या मंगळवारचे भाव
पुरी म्हणाले की, जेव्हा हा प्रस्ताव आला होता तेव्हा सुमारे एक लाख 19 हजार लोकांनी परत येण्याची इच्छा दर्शविली होती आणि त्यांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त झाली असती. अशा परिस्थितीत ज्यांना जास्त त्रास होतो त्यांना प्राधान्य दिले जाते, जसं की ज्यांचे व्हिसा संपले आहेत किंवा ज्यांना स्थानिक सरकारनं परत जाण्यास सांगितलं आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.