Home /News /entertainment /

राकेश रोशन यांनी ऋषी कपूरना दिल्लीत न जाण्याची दिली होती ताकिद आणि तिथेच...

राकेश रोशन यांनी ऋषी कपूरना दिल्लीत न जाण्याची दिली होती ताकिद आणि तिथेच...

एका मुलाखतीत राकेश यांनी सांगितले होते की त्यांनी ऋषी कपूर यांना दिल्लीमध्ये न जाण्याचे सुचवले होते. दिल्लीतच फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांच्या आजाराने डोके वर काढले

    नवी दिल्ली, 05 मे : अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन आणि दिवंगत ऋषी कपूर (Rakesh Roshan and Rishi Kapoor) यांची मैत्री संर्वांना माहित आहे. खूप काळापासून ते दोघे एकमेकांचे मित्र आहेत. 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले. ज्यावेळी राकेश यांना ही बातमी कळली तेव्हा त्यांना स्वत: रणबीरने धीर दिला होता, अशी माहिती राकेश रोशन यांनीच काही दिवसांपूर्वी दिली होती. ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच राकेश रोशन देखील कॅन्सरची लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राकेश यांनी सांगितले होते की त्यांनी ऋषी कपूर यांना दिल्लीमध्ये न जाण्याचे सुचवले होते. दिल्लीतच फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांच्या आजाराने डोके वर काढले आणि त्यांना तिथेच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. (हे वाचा-ऋषी कपूर यांच्या अस्थि विसर्जनानंतर नीतू कपूर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट) ऋषी यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड जगतामध्ये एक विशिष्ट प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. राकेश रोशन आणि ऋषी कपूर यांची दृढ मैत्री होती. ऋषी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावूक ट्वीट करून त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं. या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, 'आम्हाला दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होता. जेव्हा चिंटूने (ऋषी कपूर) मला सांगितलं की फेब्रुवारीमध्ये तो एका लग्नासाठी दिल्लीला जाणार आहे. तेव्हा मी त्याच्या विरोधात होतो. तरीही तो गेला आणि तिथेच पुन्हा एकदा त्याच्या आजाराने डोकं वर काढलं. जेव्हा त्यानंतर मी चिंटूला भेटलो तेव्हा त्याने मान्य केलं की त्याने माझं ऐकायला हवं होतं आणि दिल्लीला जाऊन त्याने चूक केली.' याचवेळी रणबीर कपूर आणि आलिया भट ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी दिल्लीला तातडीने रवाना झाले होते. ऋषी कपूर यांनी मुंबईच्या सर एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये 30 एप्रिल 2020 रोजी अखेरचा श्वास घेतला. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rakesh Roshan, Rakesh roshan cancer, Rishi kapoor

    पुढील बातम्या