Home /News /national /

ही 'लेडी सिंघम' सध्या का आहे अडचणीत? होणाऱ्या पतीला अटक केल्यानंतर आली होती चर्चेत

ही 'लेडी सिंघम' सध्या का आहे अडचणीत? होणाऱ्या पतीला अटक केल्यानंतर आली होती चर्चेत

आरोपांनुसार, उपनिरीक्षक जुनमोनी राभा राणा पोगागच्या गुन्ह्यांमध्ये सामील होत्या, जेव्हा त्याने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

  गुवाहाटी, 13 मे : एका महिला PSI ने स्वतःच्या लग्नाच्या काही महिने आधी तिच्या होणाऱ्या पतीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक ( Junmoni Rabha arrested her fiance for fraud charges) केली. आसामच्या या महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्या पतीने आपण मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असल्याचं सांगितलं होतं. जुनमोनी राभा (PSI Junmoni Rabha) असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. सुरुवातीला स्वतःच्या होणाऱ्या पतीला अटक केल्याबद्दल कर्तव्यकठोर म्हणून जुनमोनी यांचं खूप कौतुक झालं. मात्र, आता जुनमोनी यांच्यावर फसवणुकीचे आरोप होत असल्यानं या सर्व प्रकाराला वेगळं वळण लागलं आहे. जुनमोनीचा होणारा पती राणा पोगाग (Rana Pogag) याने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख खोटी सांगत असे. जुनमोनी यांनाही त्याने अशाच प्रकारे मोठा अधिकारी असल्याचं सांगून फसवलं होतं. तसंच, त्याने अनेकांना ओआयएल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी देण्याच्या खोट्या बहाण्याने करोडो रुपयांची कथितपणे फसवणूक केल्याचा आरोप त्याचावर आहे. कथेत Twist आता असं समोर येत आहे की, ही "लेडी सिंघम" तितकी प्रामाणिक नाही जितकी तिला समजली जात आहे. तिच्या होणाऱ्या पतीने केलेल्या आर्थिक गैरप्रकाराशी संबंध असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. जुनमोनी राभा असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. माजुली जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या या लेडी सिंघमविरुद्ध सात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. समोर आलेल्या आरोपांपैकी तीन अजामीनपात्र आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोन संभाषणामुळे या घोटाळ्यातील तिच्या संभाव्य सहभागाबद्दल चर्चा होत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. PSI जुनमोनी यांच्यावर होणाऱ्या पतीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप
  PSI जुनमोनी यांच्यावर होणाऱ्या पतीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप
  यापूर्वी, राभाने दावा केला होता की, तिला पोगागचा (तिचा नियोजित वर) खरा चेहरा माहिती नव्हता. परंतु, जर तिच्यावरील आरोप खरे असतील तर आता तिचा खेळ संपला आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, पोगागला माजुली येथे पोस्टिंग असताना राभाने काही लोकांसमोर तेल कंपनीची जनसंपर्क अधिकारी म्हणून ओळख करून दिली होती. त्याने तक्रारदार अजित बोराह यांना एकूण 13.72 लाख रुपये आणि राम अवतार शर्मा या अन्य व्यावसायिकाला एकूण 49.46 लाख रुपयांचा गंडा घातला. त्याला काही बँकेच्या धनादेशांद्वारे तर, काही रोखीने पैसे दिल्याचं पीडितांचं म्हणणं आहे. बोराहने आपल्या तक्रारीत राभाच्या बँक खात्यात 30,000 रुपये ट्रान्सफर केल्याचा उल्लेख केला आहे. हे वाचा - पोलिसांचीच फसवणूक? लग्नाला काही महिने बाकी असताना 'दबंग लेडी PSI' ने स्वतःच्या होणाऱ्या पतीला केली अटक एकीकडे आरोप होत असताना राभा यांची नागाव येथून कालियाबोर येथे बदली करण्यात आली आहे. नागावच्या पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, भक्कम पुरावे आढळल्यास राभाला शिक्षा केली जाईल. “दोषी सिद्ध झाल्यास तिला सहानुभूती मिळणार नाही. परंतु, एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यासाठी आम्ही ऑडिओ रेकॉर्डिंगला ठोस पुरावा मानू शकत नाही. त्याची योग्य पद्धतीने पडताळणी करणं आवश्यक आहे. तरीही, आम्ही माजुली पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करू,” असं डोले यांनी माध्यमांना सांगितलं. हे वाचा - काश्मिरी पंडितांवर हिंसाचार सुरुच, तरुणाची निर्घृण हत्या, संतापजनक घटना यापूर्वीही PSI जुनमोनी आल्या होत्या चर्चेत जुनमोनी त्यांच्या होणाऱ्या पतीच्या अटकेपूर्वीही एकदा चर्चेत आल्या होत्या. एजीपी आमदार अमिया भुयान यांच्याशी टेलिफोनिक संभाषण व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. अमिया भुयानने जुनमोनी यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाण्यास सांगितलं होतं, तेव्हा तिने त्यांना योग्य उत्तर दिलं होतं. गेल्या वर्षी माजुली बोटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने ब्रह्मपुत्रा नदीत बोटींगला बंदी घातली होती. असं असताना नदीत बेकायदेशीरपणे एक इंजिन बोट चालवल्याबद्दल जुनमोनी यांनी अमिया यांच्या मतदार संघातील काही लोकांना अटक केली होती. या लोकांना सोडण्यास अमिया यांनी जुनमोनी यांना सांगितलं होतं.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Crime news, Police

  पुढील बातम्या