Unlock 3:  प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठवा, केंद्राने राज्यांना फटकारलं

Unlock 3:  प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठवा, केंद्राने राज्यांना फटकारलं

देशात आता लॉकडाऊनचा केंद्राचा विचार नसून आवश्यक ती काळजी घेत व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यास केंद्राने सगळ्या राज्यांना सांगितले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 ऑगस्ट: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी केंद्र सरकारने आता सर्व व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. देशात सध्या Unlock 3 ची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्वेही केंद्राने जारी केली होती. मात्र या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्राने सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून फटकारलं असून प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठविण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात त्यांनी हे सर्व निर्बंध हटविण्याची मागणी केलीय. या निर्बंधांमुळे मालाच्या पुरवढ्यावर प्रतिकूल परिणाम झाले आहे. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहांवर झाला आहे. त्यामुळे हे निर्बंध हटविण्यात यावेत असंही त्यात म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाहतूकीवर अनेक निर्बंध आहेत. अजुनही जिल्हाबंदी कायम आहे. तर राज्यांमधली वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे अनेक उद्योगांना मालाचा पुरवढा सुरळीत होऊ शकलेला नाही.

देशात आता लॉकडाऊनचा केंद्राचा विचार नसून आवश्यक ती काळजी घेत व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यास केंद्राने सगळ्या राज्यांना सांगितले आहे.

‘मला भांडायचंय पण तो भांडतचं नाही’; वैतागून बायकोने मागितला घटस्फोट

दरम्यान, कोरोना व्हायरसरवर औषध मिळालेलं नसल्याने सध्या काळजी घेणं आज त्याच्यापासून वाचण्याचा उपाय आहे. त्यासाठी सातत्याने हात सॅनिटाईज करण्यास जगातले डॉक्टर्स सांगत आहेत.

त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकानंतर काही दिवसांमध्येच सॅनिटाझर मार्केटमधून संपून गेलं. त्याची प्रचंड मागणी वाढल्याने उपलब्ध असलेला माल लगेच संपून गेला.

मागणी वाढल्याने आता सॅनिटायझचं उत्पादनही वाढलं आहे. सॅनिटायझरच्या बाजारपेठेत कित्येक पटींनी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

मोठी बातमी, गाड्यांच्या रजिस्ट्रेशन नियमात होणार महत्त्वाचा बदल

देशात एकाच दिवसांमध्ये 83 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं सॅनिटायझर वापरलं जातं अशी माहिती पुढे आली आहे.

गेल्या 5 महिन्यांमध्ये अवघ्या काही कोटींवर असलेली सॅनिटायझरची उलाढाल ही आता 30 हजार कोटींवर गेल्याही माहितीही पुढे आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 22, 2020, 6:26 PM IST
Tags: lockdown

ताज्या बातम्या