मोठी बातमी, गाड्यांच्या रजिस्ट्रेशन नियमात होणार महत्त्वाचा बदल

मोठी बातमी, गाड्यांच्या रजिस्ट्रेशन नियमात होणार महत्त्वाचा बदल

मोटर वाहन कायदा 1989 च्या फॉर्म 20 मध्ये संशोधन केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : केंद्र सरकार नवीन वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) च्या नियमांमध्ये बदल करण्याच्या विचारधीन आहे. मोटर वाहन रजिस्ट्रेशन करत असताना कागदपत्रात मालकी हक्क दाखवण्यासाठी Form 20 मध्ये बदल करण्यात येणार आहे.

या नव्या नियमात बदल करण्यासाठी मोदी सरकारने लोकांची मतं आणि हरकती मागवल्या आहे.  केंद्रीय मोटर वाहन नियम (CMVR), 1989 नुसार फॉर्म 20 मध्ये संशोधन करून 18 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढण्यात आली होती.

परिवहन मंत्रालय मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाहन रजिस्ट्रेशनमधील कागदपत्रात वाहनाच्या मालकी हक्काचा पूर्णपणे उल्लेख व्यवस्थितीत केला जात नाही. त्यामुळे हा नियम बदलणे गरजेचं आहे, असं मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.

फक्त 20 पैसे किमी येईल खर्च, भारतात आली सर्वात स्वस्त आणि मस्त बाइक!

मोटर वाहन कायदा 1989 च्या फॉर्म 20 मध्ये संशोधन केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले की, 'लोकांनी वाहनं खरेदी केल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन करत असतना मालकी हक्क सिद्ध करण्यात अडचणी येत होत्या. याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच परिवहन मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात मालकी हक्क स्पष्ट करण्याच्या हेतूने मोटर वाहन कायदा 1989 मधील फॉर्म 20 बद्दल प्रस्ताव मंजूर केला आहे.

स्वायत्त संस्था, केंद्र सरकार, धार्मिक ट्रस्ट, ड्राइव्हिंग ट्रेनिंग स्कूल, दिव्यांगजन, शैक्षणिक संस्थान, स्थानीय प्राधिकरण, पोलिस विभाग आदी क्षेत्रात याचे परिणाम पाहण्यास मिळणार आहे.

वाहन खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना जर शासकीय योजनेच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना जीएसटी आणि इतर सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.  यासाठी  वाहन रजिस्ट्रेशन करताना कागदपत्रांमध्ये दिव्यांग व्यक्तीचा उल्लेख गरजेचा असणार आहे. पूर्वी असा उल्लेख केला जात नव्हता. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे या नव्या बदलामुळे दिव्यांग व्यक्तींना मोठा फायदा मिळणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आला असून तो केंद्रीय सचिवांकडे सोपवण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक वाहन विकत घेणाऱ्यांसाठी खूशखबर, मोदी सरकारने बदलला 'हा' नियम

याबद्दल जर आणखी काही सूचना किंवा हरकती असतील तर 30 दिवसांच्या आत "संयुक्त सचिव (एमवीएल), रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नई दिल्ली -110001" वर पाठवू शकता. किंवा तुम्ही morth@gov.in यावर ई-मेल सुद्धा करू शकता.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मोटर वाहन कायदा (1989) लागू करण्यात आला आहे. आता नव्या संशोधनात प्रवासी वाहतूक उल्लंघनावर दंड आणि वाहनाची सुरक्षा आणि नोंदणी संदर्भात नियमांमध्ये बदल केले आहे.

Published by: sachin Salve
First published: August 22, 2020, 5:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या