लखनऊ, 22 ऑगस्ट : लग्नानंतर पती मारहाण करतो, भांडण करतो अगदीच दारू पिऊन तमाशा करतो म्हणून घटस्फोट घेणाऱ्या बातम्या ऐकल्या असतील. मात्र लखनऊमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने पती भांडण करीत नाही म्हणून घटस्फोटाची मागणी केली आहे. तिचं म्हणणं आहे की माझा पती माझ्यावर इतकं प्रेम करतो की घराची स्वच्छता, स्वंयपाक करणं, कपडे धुणं अशी सर्व कामं तो स्वत: करतो.. उत्तर प्रदेशातील एका घरात लग्नाच्या 18 महिन्यांनंतर महिलेने पतीविरोधात घटस्फोटाची मागणी केली आहे. पत्नीने शरिया कोर्टात घटस्फोटाची मागणी केली आहे. शरी अदालतमध्ये पत्नीने सांगितले की पती खूप प्रेमळ आणि दयाळू आहेत. त्यांच्या या वागणुकीमुळे मी वैतागले आहे. त्यामुळे वेगळं व्हायचं आहे. पत्नीने आरोप केला आहे की अनेकदा पती स्वयंपाक करतो, घरातील कामात तिची मदत करतो त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद नव्हते. हे वाचा- मोठी बातमी, गाड्यांच्या रजिस्ट्रेशन नियमात होणार महत्त्वाचा बदल वाद न करता पती मागतो माफी न्यायालयात पत्नीने सांगितले की जेव्हा माझी चूक झाली तेव्हा तो मला माफ करीत होता..पण मला त्याच्या भांडायचं आहे…मात्र तो भांडतचं नाही…पत्नी पुढे म्हणाली की मी भांडण करण्यासाठी आसूसले आहे..मात्र माझ्या रोमँटिक पतीसोबत हे अशक्य आहे. न्यायालयाने मात्र हे अव्यवहारिक मानून तिची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने पती-पत्नीला स्वत:चं प्रकरण हाताळण्यासं सांगितलं आहे. न्यायलयाने याचिका फेटाळल्यानंतर महिलेने स्थानिक पंचायतीसोबत संपर्क केला, मात्र ते देखील कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ शकले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.