श्रीनगर, 06 ऑक्टोबर: मंगळवारी जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दोन तासांच्या आत तीन दहशतवादी (Terror Incident) घटना घडल्या. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा (Lieutenant Governor Manoj Sinha)यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे.
पहिली घटना श्रीनगरमधील (Srinagar)इक्बाल पार्कजवळ घडली. ज्यात काश्मिरी पंडित समुदाय आणि बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. त्याचवेळी, श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबजवळ आणखी एक घटना घडली, ज्यात दहशतवाद्यांनी रस्त्यावरील फेरीवाल्याला गोळ्या घातल्या. तिसरी घटना उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात घडली ज्यात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका मोहम्मद शफी नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
In third terror attack within an hour in J&K, man shot dead at Shahgund Hajin in Bandipora district pic.twitter.com/pL5NAb6f9n
— ANI (@ANI) October 5, 2021
जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, श्रीनगर आणि बांदीपोराच्या घटनाची माहिती मिळताच परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये नागरिकांना लक्ष्य केलं गेलं. इक्बाल पार्कजवळ दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले औषध विक्रेता आणि काश्मिरी पंडित माखन लाल यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.
हेही वाचा- वीजसंकट! 4 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा; चीनप्रमाणे भारतातही होऊ शकतो ब्लॅकआउट?
सूत्रांनी सांगितलं की, माखन लाल यांचं गोळ्यांमुळे बरंच रक्त गेलं होतं. दुसऱ्या हल्ल्यात मृत झालेल्या रस्त्यावरील फेरीवाला वीरेंद्र पासवान हा बिहारचा असल्याचं समोर आलं. तिसरी घटना बांदीपोराच्या हाजीन भागात घडली, ज्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद शफीचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादी त्यांच्या नापाक योजनांमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत आणि अशा कृत्यांना जबाबदार असणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या दुःखाच्या परिस्थितीत मी कुटुंबासोबत आहे. ही दु: खद बातमी आहे, बिंदरू यांच्या कुटुंबासाठी माझी संवेदना. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मी या हत्येचा निषेध करते, अशा हिंसक घटनांना समाजात स्थान नाही.
हेही वाचा- राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांची योगी सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले...
विशेष म्हणजे, माखन लाल बिंदरू यांच्यावर त्यांच्या दुकानातच गोळ्या झाडण्यात आल्या. ते प्रसिद्ध औषध विक्रेते होते. तसंच जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यानंतरही ते येथून गेले नाही. ते आपल्या पत्नीसह श्रीनगरमध्ये राहत होते आणि त्यांनी आपली फार्मसी बिंदरू मेडीकेट चालवत होते. काश्मिरी पंडित समाजातील अनेक लोकांनी 1990 मध्येच श्रीनगर सोडलं होतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.