मराठी बातम्या /बातम्या /देश /

वीजसंकट! 4 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा; चीनप्रमाणे भारतातही होऊ शकतो ब्लॅकआउट?

वीजसंकट! 4 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा; चीनप्रमाणे भारतातही होऊ शकतो ब्लॅकआउट?

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारतातल्या औष्णिक विद्युत अर्थात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांकडे सप्टेंबरअखेर केवळ 4 दिवस पुरेल इतकाच साठा होता.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारतातल्या औष्णिक विद्युत अर्थात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांकडे सप्टेंबरअखेर केवळ 4 दिवस पुरेल इतकाच साठा होता.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारतातल्या औष्णिक विद्युत अर्थात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांकडे सप्टेंबरअखेर केवळ 4 दिवस पुरेल इतकाच साठा होता.

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : मागील काही दिवसांपासून चीन (China energy crisi) वीज संकटाचा (Energy Crisis India) सामना करत आहे. आता भारतातही (India) असंच वीजसंकट गंभीर रूप धारण करताना दिसत आहे. भारतातला कोळशाचा (Coal crunch) साठा लक्षणीयरीत्या कमी झाल्यानं ही चिंता निर्माण झाली आहे. भारत जगातल्या सर्वांत वेगानं वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अशा स्थितीत इथलं विजेचं संकट अधिक गंभीर होणं ही बाब संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारतातल्या औष्णिक विद्युत अर्थात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांकडे (Power plants) सप्टेंबरअखेर केवळ 4 दिवस पुरेल इतकाच साठा होता. याचा अर्थ असा, की कोळशाचा पुरवठा वेळेत न झाल्यास हे प्रकल्प केवळ 4 दिवसच वीजनिर्मिती करू शकतील. गेल्या काही वर्षांतली ही सर्वांत कमी पातळी म्हणता येईल. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या प्रकल्पांमध्ये सरासरी 17 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा होता. देशातली 70 टक्के वीज कोळशावर चालणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये निर्माण होते. त्यामुळे ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे.

SANITIZERS चा खप आला निम्म्यावर, Corona कमी होतोय की त्याची दहशत?

चीनप्रमाणेच भारतही दोन प्रमुख समस्यांचा सामना करत आहे. पहिली समस्या म्हणजे विजेची वाढती मागणी (Demand). कोरोना प्रतिबंधक निर्बंध हटवल्यानं औद्योगिक उत्पादन वेगात सुरू झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. दुसरी समस्या म्हणजे देशातंर्गत कोळशाचं घटलेलं उत्पादन. भारत स्वतःच्या गरजेच्या तुलनेत 70 टक्के कोळशाची गरज स्वतः भागवतो. परंतु, मुसळधार पावसानं कोळशाच्या खाणींमध्ये पाणी साचल्याने खाणकाम बंद आहे. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पांना होणारा कोळशाचा पुरवठा लक्षणीय प्रमाणात घटला आहे.

शिर्डीत केवळ ऑनलाईन पासधारकांनाच प्रवेश, सविस्तर वाचा नवे नियम

त्यामुळे कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सध्या देशांतर्गत कोळशावर अवलंबून राहायचं की मर्यादित शिल्लक साठा बघता उच्चांकी दर असलेला परदेशातला कोळसा आयात करायचा, अशा द्विधा मनःस्थितीत आहेत.

क्रिसिल या क्रेडिट रेटिंग एजन्सीचे इन्फ्रास्ट्रक्चर अॅडव्हायजरी प्रणव मास्टर यांनी याबाबत सांगितलं, की `जोपर्यंत कोळशाचा पुरवठा पूर्ण क्षमतेनं होत नाही तोपर्यंत काही भागात वीजपुरवठा (Power Supply) बंद होण्याची समस्या उद्भवू शकते. पावसाळा संपल्यानंतर यात स्थिरता निर्माण होईल, असा अंदाज आहे.`

वीज वितरण कंपन्यांना नियामकांकडून वीज दरवाढीसाठी परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांना येत्या काही महिन्यात वीज दरवाढीचा सामना करावा लागू शकतो, असंही मास्टर यांनी स्पष्ट केले.

शासकीय आकडेवारीनुसार, भारतीय वीजनिर्मिती प्रकल्पांकडे सप्टेंबर अखेरीपर्यंत 81 लाख टन एवढा कोळशाचा साठा (Coal Stock) होता. मागील वर्षाच्या तुलनेत तो 76 टक्क्यांनी कमी आहे. परिणामी सप्टेंबरमध्ये इंडियन एनर्जी एक्स्चेंजवर स्पॉट पॉवरच्या किमती 63 टक्क्यांनी वाढून 4.4 रुपये प्रतिकिलोवॅट प्रतितास एवढ्या झाल्या आहेत.

वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा खात्रीशीरपणे होण्यासाठी सरकारने कोळसा वापरणाऱ्या अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांचा पुरवठा कमी केला आहे. यात अॅल्युमिनियम (Aluminium) आणि स्टील (Steel) उद्योगांचा समावेश आहे. कोल इंडिया लिमिटेडने वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा अधिक पुरवठा करण्यासाठी आपल्या उद्योगाचा पुरवठा कमी केल्याची तक्रार अॅल्युमिनियम कंपन्यांनी केली आहे.

First published:

Tags: Electricity, Power grid plant