मराठी बातम्या /बातम्या /देश /

45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर हिंसाचार, चीनची पहिली प्रतिक्रिया

45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर हिंसाचार, चीनची पहिली प्रतिक्रिया

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात चीनच्या 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात चीनच्या 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात चीनच्या 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
लडाख, 16 जून : भारत आणि चीन यांच्यातील तडाखच्या सीमेवरील सुरू असलेले वाद कमी होण्याचं नाव घेत नाही. दिवसेंदिवस तिथे अधिक तणावाचं वातावरण होत आहे. सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी झालेल्या वादातून भारताचे 3 जवान शहीद झाले. दोन्ही देशांमधील सैन्यात तुफान दगडफेक आणि मारहाण झाल्यानं तणावाचं वातावरण आहे. अशी परिस्थिती भारत-चीन सीमेवर 45 वर्षांनी म्हणजेच 1975 नंतर तयार झाली आहे जेव्हा भारताचे सैनिक शहीद झाले आहेत. यावेळी सैनिकांमध्ये गोळीबार नाही तर दगडफेक झाली. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या 5 सैनिकांचा या वादात मृत्यू झाला आहे. भारतीय जवानांनी लडाखमधील सीमारेषा ओल्यांडल्याचा आरोप चीनच्या विदेश मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. त्यातून निर्माण झालेल्या वादातून हा हिंसाचार घडला असून यामध्ये चीनचेही सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. हे वाचा-अजय पंडिता यांच्या हत्येनंतर जवानांनी हिजबुलच्या टॉप कमांडरला केलं ठार सध्या दोन्ही देशांच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकारी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत अतिक्रमण करत होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकही झाली. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. मात्र आज चिनी सैन्यानं पुन्हा भारतीय सैन्यावर हल्ला केला. काही वर्षांपूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा चीनचं अतिक्रमण सुरू आहे. याआधी पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून चिनी सैन्य मागे हटवण्यात आलं होतं. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती. हे वाचा-सावधान! तुमच्या घरात तर नाही आहे विषारी सॅनिटायझर? CBI नं केलं अलर्ट हे वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: China

पुढील बातम्या