नवी दिल्ली, 16 जून : कोरोनाच्या संकटात सध्या सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र आता केंद्रिय अन्वेषण विभागानं (CBI) अशी माहिती दिली आहे की, बऱ्याच ठिकाणी विषारी सॅनिटायझर विकते जात आहे. यात अत्यंत विषारी मिथेनॉलचा वापरुन हँड सॅनिटायझर तयार केले जात आहे. त्याचबरोबर आणखी एक टोळी पीपीई किटही पुरवत आहे, मात्र या किटही वापरण्यास योग्य नसल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की इंटरपोलकडून माहिती मिळाल्यानंतर CBIनं तातडीने पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले आहे. इंटरपोलचे मुख्यालय लॉयन येथे असून सीबीआयची जबाबदारी भारतातील समन्वयासाठी आहे. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, जग कोरोना विषाणूच्या विळख्यात असताना, जागतिक अर्थव्यवस्थाही ढासळत आहे. याचा फायदा घेऊन पैसे कमवण्यासाठी काही लोकं अशा खातक मार्गांचा अवलंब करत आहेत. असे सॅनिटाझर वापरणं धोक्याचे आहे, असे सांगितले.
वाचा-कोरोनामुक्त देशात पुन्हा घुसला कोरोना! एका अंत्यविधीनं वाढवली चिंता
मिथेनॉल खूप विषारी
एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, काही गुन्हेगार पीपीई किट आणि कोरोना विषाणूशी संबंधित उपकरणांचे निर्मिती करण्यासाठी हॉस्पिटल व आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. अशा वस्तूंच्या कमतरतेचा फायदा घेऊन त्यांना अधिकारी व रुग्णालयांकडून ऑनलाईन पेमेंट मिळते, परंतु पैसे घेतल्यानंतरही ते मालाचा पुरवठा करत नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंटरपोलनं बनावट हँड सॅनिटायझर तयार केले जात असल्याची माहिती दिली. मिथेनॉलपासून हे सॅनिटायझर तयार केले जात असून, हा एक अतिशय विषारी पदार्थ आहे. ते म्हणाले की कोरोनामध्ये हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. मात्र काही ठिकाणी मिथेनॉल असलेले सॅनिटाझर विकले जात आहेत. त्यामुळं ग्राहकांनीही सावधान राहावे.
वाचा-पुढचे 2 आठवडे धोक्याचे! रोज 1 लाखांहून अधिक रुग्ण वाढणार, WHO चा इशारा
संपादन-प्रियांका गावडे.