Home /News /national /

बदला घेतला! अजय पंडिता यांच्या हत्येनंतर जवानांनी हिजबुलच्या टॉप कमांडरला केलं ठार

बदला घेतला! अजय पंडिता यांच्या हत्येनंतर जवानांनी हिजबुलच्या टॉप कमांडरला केलं ठार

सुरक्षा दलानं एका महिन्यात जवळजवळ 30 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. शोपियानमध्ये 10 दिवसांत 17 दहशतवादी मारले.

    श्रीनगर, 16 जून: जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे या चकमकीत हिजबुलचा का टॉप कमांडरही मारला गेला. याचबरोबर सुरक्षा दलानं सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येचा बदला घेतला. सुरक्षा दलानं एका महिन्यात जवळजवळ 30 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. शोपियानमध्ये 10 दिवसांत 17 दहशतवादी मारले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये आज तीन दहशतवादी ठार झाले. त्यातील एक हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आहे. याच टॉप कमांडरने सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती. आता सुरक्षा दलानं अजय पंडिता यांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टंट फ्रंटनं (TRF) सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. सुरक्षा दलांनं अतिरेक्यांना ठार करत दहशतवादाचं संपवणार असल्याचं सांगितलं. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. कारवाई सुरू आहे. घटनेच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे." वाचा-पाकिस्तानात डांबून ठेवलेल्या अधिकाऱ्यांना भारतात परत पाठवा - परराष्ट्र मंत्रालय मिळालेल्या माहितीनुसार मागच्या 10 दिवसांमध्ये 23 दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. पूंछ, पुलवामा, राजौरी आणि शोपियान सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली. हे दहशतवादी शोपियांच्या तुर्कवांगम गावात लपून मोठा कट रचण्याच्या विचारात असल्याची माहिती जवानांना मिळाली. माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत संयुक्त पथक तयार केले आणि संपूर्ण गावाला घेराव घालण्यास सुरवात केली. जेव्हा या भागात शोध मोहीम सुरू झाली तेव्हा दहशतवाद्यांनी घरांमधून गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा-नैराश्यातून घडलेली धक्कादायक घटना; व्यावसायिकाने स्वत:च्याच हत्येची दिली सुपारी
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Indian army, Terrorist attack

    पुढील बातम्या