श्रीनगर, 16 जून: जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दलाला दहशतवादी घरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आजूबाजूचा संपूर्ण परिसराला जवानांनी घेरलं असून सर्ज ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन जणांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागच्या 10 दिवसांमध्ये 23 दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. पूंछ, पुलवामा, राजौरी आणि शोपियान सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
Jammu and Kashmir: Three terrorists neutralised in an encounter with security forces at Turkwangam area of Shopian, today. A search operation is underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/E7S6H7IRXU
ही दहशतवादी शोपियांच्या तुर्कवांगम गावात लपून मोठा कट रचण्याच्या विचारात असल्याची माहिती जवानांना मिळाली. माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत संयुक्त पथक तयार केले आणि संपूर्ण गावाला घेराव घालण्यास सुरवात केली. जेव्हा या भागात शोध मोहीम सुरू झाली तेव्हा दहशतवाद्यांनी घरांमधून गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.