जाहिरात
मराठी बातम्या / देश / स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक! उंट, हत्तींचा वापर, महिलांचा तर किस्साच वेगळा, कशी होती प्रक्रिया?

स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक! उंट, हत्तींचा वापर, महिलांचा तर किस्साच वेगळा, कशी होती प्रक्रिया?

स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक! उंट, हत्तींचा वापर, महिलांचा तर किस्साच वेगळा, कशी होती प्रक्रिया?

सध्या देशातील पाच राज्यात निवडणुकीचे (Election) वातावरण आहे. पण, स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 13 जानेवारी : निवडणूक (Election) म्हटलं, की राजकीय पक्षांची तयारी, उमेदवार यादीची घोषणा, प्रचाराचं नियोजन, निवडणूक आयोग (Election Commission) आणि प्रशासनाची कसरत, उमेदवारी अर्ज दाखल करणं, शक्तिप्रदर्शन, नाराजी नाट्य आदी घडामोडी पाहायला मिळतात. लवकरच देशातल्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक (Assembly elections) होत आहे. या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. प्रशासन आणि राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. देशाला सातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली पहिली निवडणूक कशी होती? हे तुम्हाला माहित आहे का? गेल्या काही वर्षांत निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे. यात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर वाढला आहे. मतदान पेटीची जागा व्होटिंग मशीननं (Voting Machine) घेतली आहे. परंतु, भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीवेळी स्थिती कशी असेल? निवडणुकीचं वातावरण कसं असेल? मतदान प्रक्रिया कशी पार पडली असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी निर्माण झाले असतील. 1951 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक (Lok Sabha elections) अनेक अर्थांनी वेगळी होती. भारत स्वतंत्र झाल्यावर 4 वर्षांनंतर पहिली लोकसभा निवडणूक पार पडली होती. ही प्रक्रिया 25 ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 दरम्यान पार पडली. देशात पहिल्या निवडणुकीवेळी ही प्रक्रिया नेमकी कशी असते, याची फारशी माहिती नागरिकांना नव्हती. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी सप्टेंबर महिन्यात मॉक इलेक्शन (Mock election) घेण्यात आलं. त्या वेळी नागरिकांना मतदान आणि निवडणुकीबाबत डेमो (Demo) देण्यात आला. युपीत भाजपला धक्क्यावर धक्के, 14 वा मोठा झटका, मंत्री धर्म सिंह सैनींचा राजीनामा `केम्ब्रिज`च्या एका अहवालानुसार, राजस्थानसारख्या (Rajasthan) वाळवंटी प्रदेशात (Desert Region) निवडणूक प्रक्रिया राबवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या भागात पोहोचण्यासाठी रस्ते नव्हते. टेलिफोन सुविधा नव्हती. त्यामुळे या भागात लष्कराच्या वाहनांमधून मतपेट्या पोहोचवण्यात आल्या. तसंच मतपेट्या पोलिंग स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी उंटांचीही मदत घेण्यात आली. मणिपूरमधली बर्मा बॉर्डर आणि त्रिपुरा राज्यात हत्तींच्या मदतीनं, तसंच लाल घोंगडी बक्षीस देऊन निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. रामचंद्र गुहा यांनी ‘सत्याग्रह’मधल्या एका लेखात म्हटलं आहे, की `त्या वेळी एक अडचण अशी होती, की अशिक्षित महिलांनी जनगणनेवेळी त्यांची नावं `अमुकची आई`, `अमुकची पत्नी` अशी सांगितली होती. त्यामुळे अशा 28 लाख महिलांची नावं मतदार यादीतून काढून टाकावीत आणि पुढील निवडणुकीपर्यंत हा प्रश्न सोडवावा, असा निर्णय सुकुमार सेन यांनी घेतला होता. निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी, तसंच निवडणुकांबाबत वृत्त देण्यासाठी आयोगानं रेडिओ आणि चित्रपटांची मदत घेतली होती.` त्या वेळी भिंती आणि ऐतिहासिक स्थळांवर पोस्टर्स चिकटवण्यात आली होती. अगदी गायीच्या पाठीवर पक्षाचं नाव लिहूनही मतं मागण्यात आली. सोनू सूदचा मोठा निर्णय; बहीण मालविका सच्चर आणि काँग्रेससाठी प्रचार करणार नाही भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1951-52मध्ये प्रथमच निवडणूक झाली. ती निवडणूक 53 राजकीय पक्षांनी लढवली. 1874 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 401 जागांसाठी ही लोकसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत 21 वर्षं पूर्ण असलेल्या नागरिकांनी मतदान केलं. त्या वेळी देशाची लोकसंख्या 36 कोटी होती आणि त्यापैकी 17.32 कोटी नागरिक मतदानासाठी पात्र ठरले. त्यापैकी 45 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष (Congress Party) विजयी झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान (Prime Minister) झाले. काँग्रेसला त्या वेळच्या अन्य मोठ्या पक्षांच्या तुलनेत चौपट मतं मिळाली होती. जागांचा विचार करता काँग्रेसनं या निवडणुकीत 364 जागा जिंकल्या, तर `सीपीआय`ला 16 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 45 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी मतदान केलं होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात