मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनू सूदचा मोठा निर्णय; बहीण मालविका सच्चर आणि काँग्रेससाठी प्रचार करणार नाही

सोनू सूदचा मोठा निर्णय; बहीण मालविका सच्चर आणि काँग्रेससाठी प्रचार करणार नाही

मालविका सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनू सूदसुद्धा आपले राजकीय करिअर सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मालविका सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनू सूदसुद्धा आपले राजकीय करिअर सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मालविका सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनू सूदसुद्धा आपले राजकीय करिअर सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

  • Published by:  News18 Web Desk

मुंबई, 13 जानेवारी - पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता सोनू सूदची(Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar) यांनी पंजाब काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मालविका यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनू सूदसुद्धा आपले राजकीय करिअर सुरू करणार असल्याची किंवा बहिणीचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या सर्व शक्यतांच्या कल्लोळात सोनू सूद याने आता मोठा निर्णय घेतला आहे.

सोनू सूद (Sonu Sood) गेल्या दोन वर्षांपासून महामारीने प्रभावित झालेल्या लोकांची मदत करण्याचे काम करत आहे. दुसर्या लाटेदरम्यान सोनूने प्रवासी मजुरांना घरी पोहोचवण्यापासून ते वैद्यकीय सुविधा देण्यापर्यंतची सर्वतोपरी मदत केली आहे. बहीण मालविका सच्चर (Malvika Sood Sachar) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सोनू सूद पुन्हा चर्चेत आला आहे. मालविका यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सोनू सूद आता लवकरच आपले राजकीय करिअर सुरू करतो की काय, किंवा बहिणीचा प्रचार करतो की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर सोनू सूद याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेला दोन डोसनंतरही झाली कोरोनाची लागण

बहिणीसाठी प्रचार करणार नाही

सोनू सूद (Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar)  या यंदा पंजाब विधानसभा निवडणूक लढणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. बहीण काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर सोनू सूद आता बहिणीचा प्रचार करतो की काय असा कयास बांधला जात होता. परंतु त्याने या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. बहीण मालविका यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करणार नसल्याचे सोनू सूद याने (Sonu Sood will not campaign for sister) टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे.

बहिणीच्या काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया

बहीण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. सोनू म्हणाला, बहिणीने घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांपासून ती तिथे रहात आहे आणि लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तिला ठाऊक आहे. लोकांशी संपर्कात राहून त्यांची थेट मदत करण्यास ती सक्षम होईल. हे पाहिल्यावर मला आनंद वाटतो.

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान खान नव्हे तर पीयूष मिश्रा होते मुख्य अभिनेता, परंतु....

राजकाराणाशी देणेघेणे नाही

आपल्या बहिण्याचा प्रचार करणार का, असा प्रश्न सोनूला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, हा तिचा प्रवास आहे. राजकारणाशी माझे काही देणेघेणे नाही. मी जे काम करत आलेलो आहे, ते पुढेही कायम करेन. तिच्यासाठी मी निवडणूक प्रचार करणार नाही. कारण तिने कठोर मेहनत करावी. तसेच तिने स्वतःचे काम स्वतः करावे,  असे मला वाटते. तुम्ही माझ्याबद्दल विचाराल तर मी नेहमी राजकारण किंवा राजकीय कार्यक्रमांशी जोडला जाणार नाही. त्यापासून मी चार हात लांबच राहीन.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Sonu Sood