मराठी बातम्या /बातम्या /देश /मृतदेहाचा फोटो काढायला गेला फोटोग्राफर, अचानक मृताच्या तोंडातून आला आवाज आणि...

मृतदेहाचा फोटो काढायला गेला फोटोग्राफर, अचानक मृताच्या तोंडातून आला आवाज आणि...

फोटोग्राफरनं फोटो काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्याला अचानक आवाज यायला लागले. जेव्हा तो मृतांच्या जवळ गेला तेव्हा त्याला कळलं की हा आवाज याच व्यक्तीच्या तोंडातून येत आहे.

फोटोग्राफरनं फोटो काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्याला अचानक आवाज यायला लागले. जेव्हा तो मृतांच्या जवळ गेला तेव्हा त्याला कळलं की हा आवाज याच व्यक्तीच्या तोंडातून येत आहे.

फोटोग्राफरनं फोटो काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्याला अचानक आवाज यायला लागले. जेव्हा तो मृतांच्या जवळ गेला तेव्हा त्याला कळलं की हा आवाज याच व्यक्तीच्या तोंडातून येत आहे.

अर्नाकुलम, 15 जुलै : केरळमधील अर्नाकुलममध्ये एक फोटोग्राफर पोलिसांच्या कागदपत्रांसाठी एका मृतदेहाचा फोटो काढत होता. मात्र फोटो काढत असताना एक विचित्र प्रकार घडला. फोटोग्राफरनं फोटो काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्याला अचानक आवाज यायला लागले. जेव्हा तो मृतांच्या जवळ गेला तेव्हा त्याला कळलं की हा आवाज याच व्यक्तीच्या तोंडातून येत आहे. फोटोग्राफरने तातडीने पोलिसांना सांगितले. यानंतर, ही मृत व्यक्ती खरत तर जिवंत असल्याचे आढळून आले.

फोटोग्राफर टॉमी थॉमस यांना अर्नाकुलम जिल्ह्यातील कलामासरी परिसरातील अॅदाथाला पोलिसांनी बोलावले होते. शिवदासन असे मृत मानल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवदासन मृत असल्याचे मानून, पोलीस त्यांच्यावर पुढील कारवाईही करणार होते. थॉमस जेव्हा मृतदेहाचा फोटो काढण्यासाठी जवळ गेले, तेव्हा त्यांना आवाज येऊ लागले. थॉमस यांनी पोलिसांना याबाबत माहित दिल्यानंतर शिवदासन जिवंत असल्याचे कळले. सध्या शिवदासन यांना त्रिशूरच्या ज्युबिली मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वाचा-कसं शक्य आहे? महिलेनं वापरलं होतं गर्भनिरोधक, तेच हातात घेऊन जन्माला आलं बाळ

शिवदासन पलक्कडमधील कलामासेरीजवळ भाड्याच्या घरात एकटे राहतात. रविवारी शिवदासन यांच्या घरातून विचित्र येऊ लागले म्हणून शेजारचे तेथे गेले. तेव्हा त्यांना शिवदासन मृत अवस्थेत आढळून आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर ही सर्व घटना घडली.

वाचा-3 बहिणी एकत्र झाल्या आई आणि मावशी; एकाच रुग्णालयात एकाच दिवशी झाली डिलीव्हरी

48 वर्षीय टॉमी थॉमस यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, गेल्या 25 वर्षांपासून ते पोलीस विभागासाठी असे फोटो काढण्याचे काम करत आहेत. ते शिवदासनच्या घरी पोहोचले तेव्हा ते डोक्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यांच्या डोक्यातून रक्त येत होतं. डोक्याला दुखापत झाल्यानं ते बेशुद्द होते. थॉमस मृतदेहाच्या जवळ गेले तेव्हा त्यांना एक आवाज आला. तेव्हा त्यांना कळलं की हा आवाज शिवदासनचा आहे. यानंतर पोलिसांनी शिवदासला रुग्णालयाच दाखल केले. उच्च रक्तदाबच्या अटॅक आल्यामुळं शिवदासन खाली पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वाचा-ALERT! ग्राहकांना बँकेतून आलेला फोन असू शकतो मोठा फ्रॉड, अशाप्रकारे घ्या जाणून

First published:
top videos