वॉशिंग्टन, 15 जुलै : बहुतेक महिलांना जुळं झाल्याचं आपण पाहिलं आहे. काही महिलांना जर एकाच वेळी तीन-चार बाळ झाल्याचंही आपण ऐकलं आहे. मात्र तीन बहिणींना एकाच दिवशी एकाच रुग्णालयात बाळ झालं आहे. एकाच वेळी या तिघीही आई आणि मावशी झाल्यात.
दनिशा हेनेस, एरिअल विल्यम्स आणि अॅशले हेनेस यूएसच्या ओहिओत राहणाऱ्या या तिघी बहिणी (Ohio sisters). तिघीदेखील गरोदर होत्या. ओहिओ हेल्थ मॅन्सफिल्ड हॉस्पिटलमध्ये (Ohio Health Mansfield Hospital) त्यांनी आपल्या प्रसूतीसाठी नाव नोंदवलं होतं. विशेष म्हणजे एकाच रुग्णालयात या तिघींचीही डिलीव्हरी एकाच दिवशी झाली. 3 जुलैला काही तासांच्या कालावधीने या तिघींचीही प्रसूती झाल्याचं मॅन्सफिल्ड न्यूज जर्नलमध्ये सांगण्यात आलं आहे.
एका प्रसूतीतज्ज्ञांने या तिन्ही बहिणींची प्रसूती केली. एरिअलने सर्वात आधी बाळाला जन्म दिला. तिला मुलगी झाली तिचं नाव सिनसेरे. त्यानंतर अॅशलेनं एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव अॅदरिन. तर सर्वात शेवटी दनिशाने मुलीला जन्म दिला तिचं नाव एमरी असं ठेवण्यात आलं. अशा पद्धतीने या तिन्ही बहिणी आई आणि मावशी झाल्या.
हे वाचा - आता Mummy tummy ची चिंता सोडा; प्रसूती पश्चात पोट वाढण्याची समस्या अशी दूर करा
असोसिएटेड प्रेस स्टोरीनुसार 50 मिलियनमध्ये असं एकच प्रकरण असतं. "एकाच दिवशी आम्हा तिघी बहिणींच्या बाळाचा जन्म होणं हे खूपच सुंदर आहे. हा आम्हाला मिळालेला हा आशीर्वादच म्हणावा लागेल", असं दनिशा म्हणाली.
"भविष्यात या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतर मुलं असण्याची गरज नाही", असं या तिघी बहिणींची आई डेबोरा वेरे मिश्कीलपणे म्हणाली.
हे वाचा - खाद्यपदार्थांच्या लिस्टमध्येही कोरोना; CORONA MENU एकदा पाहाच
"आमच्याकडे कोणत्या प्रकारची पार्टी होईल माहिती नाही, आम्ही सलग दोन दिवस पार्टी करू आणि हा दिवस साजरा करू", असं दनिशाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.