नवी दिल्ली, 15 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी भामटे विविध पद्धती वापरत आहेत. या काळात ऑनलाइन फसणुकीचे प्रमाण वाढले आहे. तुमची एखादी छोटीशी चूक महागात पडू शकते. फ्रॉड कॉलच्या माध्यमातून देखील अनेकांना शिकार बनवले जात आहे. याप्रकारच्या फसवणुकीला 'व्हॉइस फिशिंग' बोलले जाते. ही लोकं स्वत: बँकेचे अधिकारी आहोत किंवा टेक टीममधील आहोत असे सांगून फसवणूक करतात. ग्राहकांना त्यांचा विश्वास बसतो आणि ते सर्व बँकिंग किंवा आर्थिक विषयासंदर्भातील माहिती त्यांना देतात. या अशा कॉल्सपासून स्वत:चा बचाव करणे आवश्यक आहे.
सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या मते हे भामटे फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. एटीएम क्लोनिंग, व्हॉट्सअॅप वरून फसवणूक, कार्ड डेटाची चोरी, युपीआयच्या माध्यमातून चोरी, लॉटरीच्या नावाने फसवणूक, बँक खात्याची तपासणी करण्याच्या माध्यमातून फसवणूक यांसारख्या पद्धती प्रामुख्याने वापरल्या जातात.
वेळोवेळी करा बँक खात्याची तपासणी
बऱ्याचदा अशाप्रकारे फोन करणारा तो खूप प्रोफेशनल असल्याचा आव आणतो. ही लोकं स्वत: बँकेचे अधिकारी आहोत किंवा टेक टीममधील आहोत असे सांगून फसवणूक करतात. त्यानंतर ग्राहकांची गोपनीय माहिती मिळवली जाते. त्यामुळे सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते वेळोवेळी तुमचे बँक खाते तपासणे आवश्यक आहे. जर कोणत्याही प्रकारचे ट्रान्झाक्शन तुम्ही केले नसेल, तर त्याबाबत बँकेला माहिती देणेहे आवश्यक आहे.
कोणाही बरोबर शेअर नका करू ही माहिती
फ्रॉड करणारी व्यक्ती ग्राहकांना वन टाइम पासवर्ड (OTP), सिक्युअर पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, कार्डावरील सीव्हीव्ही नंबर, कार्डाची एक्सपायरी डेट, इंटरनेट बँकिंग लॉग इन आयडी-पासवर्ड आणि अन्य काही माहिती विचारते. लक्षात ठेवा बँक यासंदर्भातील कोणतीही माहिती विचारण्यासंदर्भात फोन करत नाही. ही सर्व माहिती तुमची असते, आणि ती गोपनीय असते. बँक कर्मचारी ही माहिती विचारत नाहीत. त्याचप्रमाणे ग्राहकांनी अशी माहिती व्हॉट्सअॅपवर देखील कोणाबरोबरही शेअर करू नये. जर तुम्ही कुणाला अशी माहिती दिली असेल, तर त्वरित बँकेशी संपर्क करणे गरजेचे आहे
या मार्गांनी देखील केले जाते खाते रिकामे
डेबिट/क्रेडिट कार्डाच्या डेटाची चोरी
एटीएम कार्ड क्लोनिंग
बँक खात्याच्या तपासणीच्या नावाने फसवणूक
नोकरी देतो असं सांगून ऑनलाइन फ्रॉड
मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन फसवणूक
WhatsApp कॉल करून फ्रॉड
UPIच्या माध्यमातून फ्रॉड
क्यूआर कोडच्या माध्यमातून फसवणूक
लॉटरी, पेट्रोल पंप डीलरशीपच्या नावाने ऑनलाइन फ्रॉड
ई-मेल स्पूफिंग
रिवॉर्ड पॉइंटच्या नावाने फसवणूक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.