कोझिकोडे, 27 मार्च : कोरोनामुळे भारतासारख्या विकसनशील देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून आर्थिक फटका सहन करत आहोत. अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण खरं नुकसान झालं आहे ते हातावर पोट असणाऱ्याचं. पण अशातच अनेक मदतीचे हात पुढे येतात. अनेकजण मोठ्या मनाने पैशाची मदत करत आहेत. केरळमधील चकुन्नी हे सुद्धा अशा मदतगारांपैकीच एक. त्यांचं 12 लाखांचं नुकसान होत असताना सुद्धा त्यांनी ही मदत देऊ केली आहे. (हे वाचा- RBI कडून 3 महिन्याच्या EMI वर सूट, जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ) केरळमधील कोझिकोडे याठिकाणी चकुन्नी यांची जागा आहे. या जागेवर जवळपास 100 दुकानं आहेत. भाड्याने दिलेली ही दुकानं लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे दुकानदारांचं नुकसान होत आहे आणि ते यावेळी भाडं देऊ शकणार नाहीत, याची कल्पना चकुन्नी यांना आली आणि त्यांनी चक्क एका महिन्याचं भाडं माफ केलं आहे. यामुळे जवळपास 12 लाखांचं नुकसान होणार आहे. “अशा परिस्थितीतून व्यवसाय जात असेल, तर काय दुख: होतं हे मी समजू शकतो. काही वर्षांपूर्वी माझीही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अडचणीत असलेल्या या सर्वांना मदत करण्याची ही योग्य वेळ असल्याचं मला वाटलं,” अशी प्रतिक्रिया चकुन्नी यांनी दिली आहे. (हे वाचा- VIDEO : …म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं पाहा) चकुन्नी यांनी सुरूवातीच्या काळात सेल्समन म्हणून काम केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘चकुन्नी आणि कंपनी’ची स्थापना केली. व्यावसायाच्या क्षेत्रामध्ये अशा परिस्थितीत काय तोटा होऊ शकतो याची जाणीव चकुन्नी यांना होती. त्यामुळे त्यांनी दुकानदारांवर ओढवलेलंं एवढं मोठं संकट ओळखून हा निर्णय घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या दुकानदारांनी त्यांना भाडं नंतर देण्याबदद्ल विचारणा केली होती. त्यांचा मुलगा भाडं घेण्यास गेला तेव्हा मात्र या दुकानदारांकडे पैेसे नव्हते. काहींनी भाडं देण्याासाठी कर्ज काढलं होतं तर काही जणांकडे त्यांच्या कामगारांना देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. चकुन्नी यांनी स्वत: जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एकही ग्राहक तिथे फिरकत नाही आहे. चकुन्नी यांनी तात्काळ त्या जागेचे कुटुंबातील 4 मालक आणि ऑडिटरशी संपर्क साधला आणि हा महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘मी फायदा आणि नुकसानाचा विचार न करता माणुसकीचा विचार केला’, असं अभिमानाने चकुन्नी सांगतात. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत असे मदतीचे हात अनेकांना जगण्याची आणि लढण्याची उमेद देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







