Home /News /national /

17 वर्षे वाट पाहिली बेपत्ता मुलाची, अखेर वडिलांनी उचललं मोठं पाऊल

17 वर्षे वाट पाहिली बेपत्ता मुलाची, अखेर वडिलांनी उचललं मोठं पाऊल

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

सात वर्षांचा मुलगा अलप्पुझा येथील त्यांच्या घराजवळील मैदानातून बेपत्ता झाला होता. 18 मे रोजी या घटनेला 17 वर्षे पूर्ण झाली.

    कोची, 24 मे: केरळमध्ये (Kerala) एका वडिलांनी आपल्या बेपत्ता मुलासाठी 17 वर्षे वाट पाहिल्यानंतर आत्महत्या (committed suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांचा सात वर्षांचा मुलगा अलप्पुझा येथील त्यांच्या घराजवळील मैदानातून बेपत्ता झाला होता. 18 मे रोजी या घटनेला 17 वर्षे पूर्ण झाली. हे प्रकरण केरळमधील सर्वात खळबळजनक न सुटलेले रहस्य होते. या प्रकरणाची उकल करण्यासाठी सीबीआयला पाचारण करण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि तपास यंत्रणेने अखेर कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. जबरदस्त..! 15 पिस्तूलसह पाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक, 300 काडतुसेही जप्त ए.आर. राजू यांनी 22 मे रोजी मुलगा राहुलच्या सापडण्याचं अधुरं स्वप्न ठेवून जीवन संपवलं. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची पुष्टी केली असली तरी यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येचा मुलाच्या प्रकरणाशी संबंध जोडलेला नाही. द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कुटुंबाचे शेजारी एम एस मुजीब म्हणाले, राजू नोकरीच्या शोधात होता कारण त्याची पत्नी मिनीच्या तुटपुंज्या कमाईवर कुटुंब चालत होते, जी एका सरकारी फर्ममध्ये अर्धवेळ काम करते. तो नुकताच कोचीला मुलाखतीसाठी गेला होता.” राजू 52 वर्षांचे होते. राजू यांचा मुलगा राहुल 18 मे 2005 रोजी बेपत्ता झाला होता. त्यावेळी राजू कुवेत येथे एका खासगी फर्ममध्ये कामाला होते. वडिलांनी लगेच नोकरी सोडली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाच्या शोधात केरळला परतले. या प्रकरणाचा तपास राज्य पोलीस, गुन्हे शाखा आणि सीबीआयच्या तीन पथकांनी वर्षानुवर्षे केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. इतका वेळ राजू आणि मिनी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाची वाट पाहत होते. ते त्यांच्या लँडलाईन फोनवर चिकटून असायचा की कदाचित कोणीतरी फोन करून काही बातमी देईल. ते म्हणाले की राहुलला नंबर माहित आहे. राहुल बेपत्ता झाल्यानंतर पाच वर्षांनी मिनीने शिवानी नावाच्या मुलीला जन्म दिला. चमत्कार..! दफन केल्यानंतर तासाभरात नवजात मुलगी कबरीतून जिवंत बाहेर आपल्या मुलाची कोणतीही बातमी न मिळाल्याने, राजू कुवेतला परत गेले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे परत आले. शेजारचे मुजीब म्हणाले, मुलीच्या जन्मानंतर कुटुंब दुःखावर मात करण्याचा प्रयत्न करत होते. सीबीआयने हे प्रकरण बंद केले असले तरी त्यांना चांगल्या बातमीची अपेक्षा होती. त्यांनी राहुलची फोटो या आशेने ठेवली की त्यांचा शोध लागला तर त्या फोटोंमुळे त्यांना मुलगा ओळखण्यास मदत होईल. राजू आपल्या मुलाच्या शोधात केरळमध्ये अनेक ठिकाणी गेला. 2009 मध्ये, सीबीआयने केस बंद करण्याच्या परवानगीसाठी न्यायालयात धाव घेतली, मात्र वैज्ञानिक तपास करण्यास सांगितले. एकूणच, एजन्सीने राहुलच्या शेजारच्या दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी केली आणि अगदी शेजारी रोजो जॉर्जची पॉलीग्राफ चाचणी केली. 2014 मध्ये, सीबीआयने कोची येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला. तो अहवाल स्वीकारला गेला. रविवारी पत्नी आणि मुलगी घराबाहेर असताना राजूने घरात गळफास लावून घेतला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kerala

    पुढील बातम्या