बनिहाल, 24 मे: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir)बनिहालमधून (Banihal) एक आगळीवेगळी बातमी समोर येतेय. एका नवजात मुलीला म्हणजेच जन्मानंतर लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर नवजात मुलीला (Newborn Baby Girl) दफन केल्यानंतर लगेचच सुमारे एका तासाच्या आत कबरीतून जिवंत बाहेर आलीय. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला होता आणि तिच्या कुटुंबानं स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलगी चमत्कारिकरित्या जिवंत सापडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आंदोलनं केलं. त्याची दखल घेत प्रशासनाने डिलिव्हरी रूममध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितलं. सोमवारी मुलीचा जन्म झाला स्थानिक सरपंच मंजूर अल्यास वाणी यांनी सांगितले की, ही मुलगी बशारत अहमद गुजर आणि शमीना बेगम यांची आहे. नॉर्मल प्रसूतीमुळे सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात मुलीचा जन्म झाल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, हे दाम्पत्य रामबन जिल्ह्यातील बनिहालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकूट गावचे रहिवासी आहेत. वाणी यांनी आरोप केला की मुलीला मृत घोषित करण्यात आलं आणि तिला दोन तास रुग्णालयात कोणत्याही डॉक्टरांनी पाहिले नाही, त्यानंतर कुटुंबाने तिला होल्लान गावात दफन करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे दाम्पत्य रुग्णालयात परतले तेव्हा काही स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला, असे त्यांनी सांगितले. यामुळे कुटुंबीयांना सुमारे तासाभरानंतर मुलीला कबरीतून बाहेर काढावं लागलं. शिवसेना सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करणार? भाजपच्या मोर्चाला भाड्याने माणसं? TOP बातम्या मुलीला कबरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. वाणी यांनी सांगितले की, जेव्हा मुलीला कबरीतून बाहेर काढले तेव्हा ती जिवंत असल्याचे आढळून आले, त्यानंतर कुटुंबीय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. “प्रारंभिक उपचारानंतर, मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचारासाठी श्रीनगरला पाठवले,” असं त्यांनी म्हटलं. स्वत: पंच असलेले गुज्जर नेते चौधरी मन्सूर यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. या घटनेनंतर, कुटुंब आणि इतरांनी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्यांच्या अव्यावसायिक वृत्तीच्या विरोधात आंदोलन केलं. बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) डॉ राबिया खान यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या म्हणाले की, आम्ही स्त्रीरोग विभागात काम करणार्या कनिष्ठ कर्मचारी नर्स आणि सफाई कामगारांना तत्काळ प्रभावाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तपासणीनंतर तपशीलवार माहिती सामायिक केली जाईल असे डॉ. खान यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.