मराठी बातम्या /बातम्या /देश /

Terrorists Arrested: श्रीनगरमध्ये 15 पिस्तूलसह पाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक, 300 काडतुसेही जप्त

Terrorists Arrested: श्रीनगरमध्ये 15 पिस्तूलसह पाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक, 300 काडतुसेही जप्त

Terrorists Arrested: बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानं गोशबुग पट्टण येथील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकललं आहे.

Terrorists Arrested: बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानं गोशबुग पट्टण येथील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकललं आहे.

Terrorists Arrested: बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानं गोशबुग पट्टण येथील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकललं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 24 मे: जम्मू-काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) सोमवारी तीन वेगवेगळ्या कारवाईत मोठे यश मिळाले. पोलिसांनी श्रीनगरमध्ये दोन संकरित दहशतवाद्यांना (Hybrid Terrorists) आणि बारामुल्लामध्ये (Baramulla) तीन आणि कुपवाडा जिल्ह्यात (Kupwada district) एका दहशतवादी साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांसह घातक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानं गोशबुग पट्टण येथील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकललं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी श्रीनगर जिल्ह्यातील छानपोरा भागात शोध मोहिमेदरम्यान दोन लष्कर/टीआरएफ संकरित दहशतवाद्यांना अटक केली. छानपोरा येथील खान कॉलनीत राहणारा आमिर मुश्ताक गनई उर्फ ​​मुसा आणि छानपोरामधील बाटपोरा येथील रहिवासी अझलान अल्ताफ भट अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 15 पिस्तूल, 30 मॅगझिन, 300 काडतुसे आणि एक सायलेन्सर, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असा भक्कम साहित्य जप्त करण्यात आला आहे.

श्रीनगरच्या दहशतवाद्यांना पाकिस्तामधून शस्त्रे पुरवठा

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की ही शस्त्रे श्रीनगरमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांना लष्कर/TRF च्या पाकिस्तानस्थित हँडलर्सनी पाठवली होती आणि ती श्रीनगर शहरातील नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी वापरली जाणार होती. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे पिस्तूल श्रीनगरमधील अन्य दहशतवाद्यांना पुरवणार होते.

बारामुल्लामध्ये सरपंच हत्येचा पर्दाफाश

दरम्यान, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण भागात पोलीस आणि लष्कराने तीन संकरित दहशतवाद्यांच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. त्यांच्या अटकेनं गोशबुग भागातील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एसएसपी बारामुल्ला रईस मोहम्मद भट यांनी सांगितलं की, 15 एप्रिलला इफ्तारच्या एक तास आधी अज्ञात दहशतवाद्यांनी पल्हलन, पट्टणमधील वुसान भागातील चंदरहामाच्या बागेत गोशबुग बीचे सरपंच मंजूर अहमद बंगरू यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर लगेचच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

First published:

Tags: Jammu and kashmir, Srinagar, Terrorist